six month baby sold in three lakh gang arrested from karnataka crime Sakal
पुणे

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

पुणे रेल्वे स्थानकातून सहा महिन्यांच्या बालकाचे अपहरण करून विक्री करणाऱ्या कर्नाटकातील टोळीचा बंडगार्डन पोलिसांनी पर्दाफाश केला. आरोपींनी बालकाची तीन लाख रुपयांत विक्री केल्याचे समोर आले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे रेल्वे स्थानकातून सहा महिन्यांच्या बालकाचे अपहरण करून विक्री करणाऱ्या कर्नाटकातील टोळीचा बंडगार्डन पोलिसांनी पर्दाफाश केला. आरोपींनी बालकाची तीन लाख रुपयांत विक्री केल्याचे समोर आले असून, पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून बालकाची सुखरूप सुटका केली.

चंद्रशेखर मलकाप्पा नडुगंडी (वय २४, रा. जंबगी, जि. विजापूर, कर्नाटक) आणि सुभाष पुतप्पा कांबळे (वय ५५, रा. लवंगी, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी चंद्रशेखर आणि त्याच्या साथीदारांनी बालकाला सुभाष कांबळे (वय ५५, रा. लवंगी, जि. सोलापूर) याला विकल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून बालकाची सुखरूप सुटका केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंग दांपत्य यवतमाळ येथून पुण्यात नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते. रात्री ते पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात झोपले होते. त्यावेळी आरोपींनी पहाटे दोनच्या सुमारास आईजवळ झोपलेल्या सहा महिन्यांच्या बालकाला उचलून नेले. याबाबत तेलंग यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग) प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सुर्वे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांनी तपास पथकाला सूचना दिल्या.

त्यानुसार पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्हीमधील चित्रीकरण तपासले.

त्यात संशयित आरोपी कोणत्या मार्गाने गेले हे दिसून येत नव्हते. आरोपी मोटारीतून गेले असावे, असा संशय बळावल्याने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तपासात आरोपी कर्नाटक राज्यातील विजापूरला गेल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार पोलिसांनी आरोपी नडुगंडीला विजापूरमधून ताब्यात घेतले. नडुगंडीने चार साथीदारांच्या मदतीने बालकाचे अपहरण केले. त्यानंतर आरोपी कांबळेला तीन लाखांत विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी विजापूरमधील एका हॉटेलमधून कांबळेला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

Maharashtra Ganesh Visarjan Live: पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप

डीपफेक फोटो प्रकरणी सीजेपीच्या दीपके, दास आणि रांका यांच्याकडे मागितले स्पष्टीकरण; दिल्ली उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT