Six NGT employees reported positive corona Will be closed for 3 working days in pune 
पुणे

एनजीटीच्या सहा कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह; 3 दिवस कामकाज राहणार बंद

सकाळवृत्तसेवा

पुणे : येथील राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या (एनजीटी) कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आजपासून पुढील तीन दिवस (3 ते 5 सप्टेंबर) एनजीटीचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत पुणे एनजीटीचे रजिस्टार एस. एन. राजुरकर यांनी परिपत्रक काढले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बंद कालावधीत न्यायाधीकरणातील प्रकरणांना पुढील तारीख देण्यात आली आहे. या बदलाची नोंद घेण्याचे अवाहन याचिकाकर्ते, प्रतिवादी आणि त्यांच्या वकीलांना करण्यात आले आहे. बंद कालावधीत एनजीटीचा पुर्ण परिसर सॅनिटाइझ करण्यात येणार आहे. 
एनजीटीसारखी परिस्थिती काही दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयात उद्भवली होती. न्यायालयातील काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने दोन कोर्ट हॉल बंद करण्यात आले होते. त्यामुळे आता प्रकरण दाखल केल्यानंतर त्याची कागदपत्रे 24 ते 48 तास वेगळी ठेवण्यात येत आहेत. त्यानंतर त्यावर सूनावणी होत आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत एनजीटी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सौरभ कुलकर्णी यांनी सांगितले की, एनजीटी कार्यालयातील सहा कर्मचारी नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. त्यांच्यापासून इतर कोणाला कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दिवस कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. 6 सप्टेंबरपासून कामकाज नियमित सुरू होईल. पक्षकारांची गैरसोय होऊ नये म्हणून या काळात सुनावणी असलेल्या प्रकरणांना पुढची तारीख देण्‍यात आली आहे.
 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil on Hasan Mushrif : मानाच्या गणपती पूजनानंतर सतेज पाटलांनी हसन मुश्रीफांना केलं टार्गेट; "गोकुळच्या निवडणुकीत पराभव दिसू लागला"

Sugarcane Agitation : माजी खासदार राजू शेट्टी माजी सहकार मंत्र्यांच्या भेटीला ऊस आंदोलनात सहकार्य करण्याची केली विनंती

Water Shortage: अवैध पाणी उपसा करणाऱ्या मोटारी प्रशासनाकडून जप्त

Maharashtra Ganesh Visarjan Live: अलका चौकात गणरायाच्या स्वागतासाठी साकारली भलीमोठी आकर्षक रांगोळी, गणपती मिरवणुकीच्या उत्साहात रंगले पुणे

New Blood Group: वैज्ञानिकांनी शोधला अतिदुर्मिळ 'JAMA' ब्लड ग्रुप! जाणून घ्या रुग्णांना काय होणार फायदा...

SCROLL FOR NEXT