Sasoon Hospital Lift Sakal
पुणे

Sasoon Hospital : ससूनच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या सहाजणांची सुखरूप सुटका

ससून रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या लिफ्टमध्ये शुक्रवारी दुपारी सहाजण अडकल्याची घटना घडली. सुमारे पाऊण तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ससून रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या लिफ्टमध्ये शुक्रवारी दुपारी सहाजण अडकल्याची घटना घडली. सुमारे पाऊण तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली. ससूनमधील रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचारी असे सहाजण दुपारी बाराच्या सुमारास लिफ्टमधून तळमजल्यावर जात होते.

परंतु लिफ्ट चौथ्या आणि पाचव्या मजल्यादरम्यान अडकली. लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांनी घाबरून मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यावर रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी लिफ्ट तळमजल्यावर आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्यांनी अग्निशामक दलास कळविले.

अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोचले. त्यांनी लिफ्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांना ‘घाबरू नका, आम्ही आहोत’, असा धीर देत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जवानांनी लिफ्टचा दरवाजा वाकवून दोन महिलांसह सहाजणांची सुटका केली.

अग्निशामक दलाचे अधिकारी संजय रामटेके, प्रशांत गायकर, सचिन चव्हाण, ओंकार साखरे, सुनील नामे, केतन नरके, परेश जाधव आणि अक्षय शिंदे मदतकार्यात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय; पत्रकार परिषद घेत म्हणाले...

Holi Holiday: मोठी बातमी! होळीपूर्वी पगार होणार; ३ दिवस सुट्टी मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Ambulance Accident: रुग्णवाहिकेची चाकेच निखळतात तेव्हा...,आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर; चालकाने जे केलं ते खतरनाक

T20 World Cup : न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामना पाकिस्तानसाठी का आहे महत्त्वाचा? आजच शेजाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार...

Mumbai Local: लोकल प्रवास अधिक सुरक्षित होणार, प्रवासी सुविधा वाढणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT