44crime_logo_525_1.jpg 
पुणे

पुणे : पेन्सिल टोचल्याने सहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी 

पांडूरंग सरोदे

पुणे : खासगी शाळेत पहिलीमध्ये शिकणाऱ्या 6 वर्षांच्या मुलीच्या शरीरावर तिच्याच वर्गातील मुलाने पेन्सिल टोचल्याने मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना येरवडा परिसरात घडली. या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी वर्गशिक्षिकेविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी मुलीच्या आईने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून 39 वर्षीय शिक्षिकेविरुद्ध बालकांची काळजी आणि संरक्षण कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस उपनिरीक्षक मनीषा टुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती खासगी कंपनीमध्ये काम करतात. त्यांची सहा वर्षांची मुलगी येरवड्यातील एका खासगी शाळेमध्ये पहिलीमध्ये शिकते.18 मार्चला दुपारी पावणे एक वाजता वर्गातील सर्व मुले नृत्याची तयारी करण्यासाठी शाळेच्या मैदानात गेले. त्यावेळी फिर्यादी यांच्या मुलीला झोप येऊ लागल्याने ती वर्गात झोपली. त्यावेळी तिच्या वर्गातीलच सहा वर्षाच्या मुलाने स्केच पेन्सिल तिच्या शरीराला टोचवून तिला गंभीर जखमी केले. या घटनेनंतर मुलीला खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मुलगी शुद्धीवर आल्यावर तिने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पोलिसांनी संबंधित मुलाचे व त्याच्या पालकांचे समुपदेशन केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT