PSI Sakal
पुणे

विद्या प्रतिष्ठानचे सोळा विद्यार्थी बनले पीएसआय

विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील सोळा विद्यार्थ्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

मिलिदं संगई

विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील सोळा विद्यार्थ्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

बारामती - विद्या प्रतिष्ठानच्या (Vidya Pratisthan) कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा (Competititon Exam) केंद्रातील सोळा विद्यार्थ्यांनी (Students) पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली आहे.

ग्रामीण भागातील मुलामुलींना पोलिस दलात भरती होण्यासाठी शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतला होता. संस्थेच्या पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातून प्राजक्ता घुले, कल्याणी जावळे, प्रतीक्षा वणवे, अश्विनी कदम, दिपाली धालपे, संजय कोकरे, दत्तात्रय बाराते, शैलेश मोरे, अशोक नरोटे, नीलेश ओमासे, पृथ्वी बाराते, मनोज कदम, मनोज आळंद, शंकर पाटील, शुभम शिंदे, दीपक लोणकर यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाची परिक्षा उत्तीर्ण होऊन एकाच वेळी भरती होतील, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी दिली.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. सुनिल ओगले मंगळवेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे, डॉ. विलास बुवा, डॉ. संजय खिलारे, डॉ. सुनिल ओगले व स्वतः डॉ भरत शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

या सोळा विद्यार्थ्यांमध्ये पाच मुली आहेत. जागतिक महिला दिनी त्यांची निवड झाली त्यामुळे महाविद्यालयात ख-या अर्थाने महिला दिन साजरा झाला असे प्रतिपादन सचिव अँड. नीलिमा गुजर यांनी केले.

संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, विश्वस्त सुनेत्रा पवार, डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT