Devendra Fadnavis sakal
पुणे

Metro Station : मेट्रो स्टेशन स्काय बसने जोडणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

‘पुण्यात मेट्रो मार्गाचा विस्तार असताना हिंजवडी आयटी पार्कमधील आस्थापना आणि मेट्रो स्टेशन स्काय बसने जोडले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना गाड्या वापरण्याची वेळ येणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘पुण्यात मेट्रो मार्गाचा विस्तार असताना हिंजवडी आयटी पार्कमधील आस्थापना आणि मेट्रो स्टेशन स्काय बसने जोडले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना गाड्या वापरण्याची वेळ येणार नाही. यासंदर्भातील सर्व मान्यता झाल्या असून लवकरच याचे भूमीपूजन केले, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमीपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, दिपील कांबळे, संजय काकडे, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, हेमंत रासने आदी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘पुणे हे देशातील प्रमुख शहरांपैकी एक असून, ही फ्युचर सिटी आहे. त्यामुळे या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. पुण्यात मेट्रो मार्गांचे विस्तार होणार आहे. दिवाणी न्यायालय ते स्वारगेट या भूमीगत मेट्रोची नुकतीच यशस्वी चाचणी झाली आहे. लवकरच पुण्यात ५४ किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होईल. शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोचे काम सुरु आहे.

हिंजवडी आयटी पार्कमधील मेट्रो स्टेशन स्काय बसने जोडले जाणार आहेत. हा प्रयोग करण्यासाठी सर्व आवश्‍यक मान्यता मिळालेल्या असून, मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांची तारीख घेऊन भूमीपूजन केले जाईल. मेट्रोने प्रवास केल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या आस्थापनेपर्यंत जाण्यासाठी गाडी न वापरता स्कायबसने जाता येईल. त्यामुळे प्रदूषण देखील कमी होईल.

राज्यात पुन्हा आमची सत्ता आल्यानंतर पुण्याच्या रिंग रोडच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच कामाला सुरू होईल. रिंग रोड मुळे एक लाख कोटींची गुंतवणूक पुण्यात होणार असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

कॅन्टोन्मेंट हद्दीत महापालिकेच्या योजनांचा लाभ

पुणे महापालिकेतर्फे आरोग्य योजनांसह इतर योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांचा कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांना लाभ दिला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच पुण्यात रेल्वेच्या जागांवर झोपडपट्ट्या झालेल्या आहेत. तेथे एसआरए राबवून नागरिकांना पक्की घरे देण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करेल. कॅन्टोन्मेंट बोर्डाला जीएसटीच्या उत्पन्नातून वाटा मिळावा यासाठीही केंद्राकडे पाठपुरावा करू असे फडणवीस यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंवर टीका

कोरोनाच्या काळात इतर राज्यात मोठ्या प्रमाणात कामे झाली. पण त्या काळच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाला घरी बसण्याचा आणि सगळे काम बंद ठेवून राज्य ठप्प करण्यात इंटरेस्ट होता. पण आता आपण पुन्हा वेगाने कामे सुरु केली, अशी टीका फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

बसस्थानक बंद केल्याने प्रवाशाची गैरसोय

कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या शुभारंभ करण्यासाठी पूल गेट येथील पीएमपी बस स्थापकाच्या जागेवर आमदार कांबळे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे हे बस स्थानक बंद ठेवण्याची वेळ पीएमपीवर आली. या स्थानकातील बस इतर ठिकाणी थांबविण्यात आल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला.

अनेकांना बस पकडण्यासाठी पायपीट करावी लागली, तसेच बस चुकल्याने नागरिकांचा वेळही वाया गेला. नागरिक शिरीष रेड्डी म्हणाले, ‘पीएमपीचे बसस्थानक बंद करून कार्यक्रम घेतल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. तसेच पीएमपीचे किती नुकसान झाले हे सुद्धा जाहीर केले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : अभिनेता सोनू सूद पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी अमृतसर विमानतळावर दाखल

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा विसर्जनाच्या प्रतीक्षेत, चिंतामणीला दिला निरोप

SCROLL FOR NEXT