Panchnama Sakal
पुणे

आधी पेढे, मोदकांचं बोला नाहीतर लावतो ‘ईडी’चा फेरा!

‘तुम्ही अजून गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवाचा हिशेब दिला नाही. त्यामुळे सोसायटीच्या अध्यक्षपदावर राहण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही.

सु. ल. खुटवड

‘तुम्ही अजून गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवाचा हिशेब दिला नाही. त्यामुळे सोसायटीच्या अध्यक्षपदावर राहण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. वर्गणीमध्ये तुम्ही गैरव्यवहार करत असल्याचे लेखी पुरावे माझ्याकडे आहेत. आता तुमच्यामागे ‘ईडी’ची चौकशी लावतो की नाही बघा.’’ अध्यक्ष कारंडे यांच्यावर जनुभाऊ संतापले होते. गणपतीच्या आरतीवेळी प्रसाद म्हणून फक्त साखर वाटल्याने ते चांगलेच उखडले होते.

‘गणेशोत्सवाच्या बैठकीत कारंडे यांनी आरतीनंतर दररोज उकडीचे मोदक व पेढे वाटले जातील’’, असे जाहीर केले होते. त्यासाठी व इतर खर्चासाठी पाचशे रुपये वर्गणी काढायचे ठरले. आमच्यासारख्या पापभीरू  व लोकशाही मानणाऱ्या व्यक्तींनी ताबडतोब वर्गणी भरली. मात्र, प्रसाद म्‍हणून साखरेवरच भागवले जातेय. ही सोसायटीच्या सभासदांची शुद्ध फसवणूक आहे. त्याचा मी प्रथम निषेध करतो’’. जनुभाऊ तारस्वरात बोलले.

सोसायटीच्या अध्यक्षपदावरून डावलले गेल्याने जनुभाऊंच्या मनात कारंडे यांच्याविषयी राग होता. त्यामुळे त्यांना खिंडीत गाठण्याचा एकही प्रयत्न ते सोडत नव्हते. ‘‘आम्ही आमच्या कष्टाच्या पैशातून वर्गणी व मेन्टेनन्स देतो. मात्र, त्यात गैरव्यवहार करून, कारंडे आपला संसार चालवतात की काय, अशी मला शंका आहे. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील व्यवहारांची ‘ईडी’कडून चौकशी झाली पाहिजे. मी आजच ‘ईडी’ला पत्र लिहिणार आहे.’’ जनुभाऊंनी आपला पुढील इरादा स्पष्ट केला.

‘आज मी जर सोसायटीचा अध्यक्ष असतो तर प्रसाद म्हणून मी स्वत:च्या खर्चाने मोदक आणि पेढे वाटले असते. शिवाय नाश्त्याची आणि जेवणाचीही सोय केली असती. मात्र, सध्याचे अध्यक्ष इतके कवडीचुंबक आहेत की, स्वत:च्या खर्चाने चहाही पाजणार नाहीत. चुकून कोणाला पाजला तर तो खर्च सोसायटीच्या हिशेबवहीत मांडतात. अशा कंजूष अध्यक्षांचा मी दुसऱ्यांदा निषेध करतो,’’ असे आवाहनही जनुभाऊंनी केले.

सगळं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर अध्यक्ष कारंडे म्हणाले, ‘‘खरं तर जनुभाऊ राजकारणातच असायला हवे होते. दुसऱ्यांवर बिनबुडाचे आरोप करण्याच्या त्यांच्या या गुणांचे तिथे चीजच झाले असते. गेल्यावर्षीच्या खर्चाचा हिशेब मी दिला नाही, असा त्यांनी आरोप केला आहे. वास्तविक गेल्यावर्षी आपण सोसायटीचा गणपती बसवला होता. मात्र, कोरोनामुळे आम्ही तीन-चार पदाधिकारीच आरतीला उपस्थित असायचो. आम्हीच घरून प्रसाद घेऊन यायचो. कसला खर्चच नसल्याने गेल्यावर्षी आपण वर्गणीही काढली नव्हती. त्यामुळे जमाही नाही आणि खर्चही नाही. त्यामुळे हिशेब देण्याचा प्रश्नच नाही’’, कारंडे यांनी खुलासा केला. त्यावर जनुभाऊ म्हणाले, ‘‘ऑडिटला हे असलं चालत नाही. तुम्ही ‘गणेशोत्सवाचा जमा-खर्च : जमा शून्य व खर्च शून्य’ असा ताळेबंद सोसायटीच्या फलकावर लावायला हवा होता. तो का मांडला नाही? तुम्हाला एवढंही जमत नसेल तर अध्यक्षपदावर राहण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही’’.

जनुभाऊंचं बोलणं ऐकल्यानंतर कारंडे म्हणाले, ‘‘गेल्यावर्षी कसलाही जमा-खर्च नसतानाही तुम्ही हिशेब मागताय. पण त्याच्या आधीच्या वर्षी तुम्हीच अध्यक्ष होतात. त्यावर्षीच्या गणेशोत्सवाचा हिशेब तुम्ही अजून दिला नाही. त्याविषयी बोला’’, कारंडे यांचा पलटवार पाहून जनुभाऊ एकदम बॅकफूटला गेले व कसंबसं म्हणाले, ‘‘अहो चालायचंच. एखाद्या वर्षीचा हिशेब कोणी दिला नाही म्हणून कोणी ‘ईडी’ची चौकशी लावतं का? आपण एका सोसायटीत गुण्यागोंविदाने राहणारे आहोत. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे’’. तेवढ्यात कोंडेकर यांनी मोदक व पेढ्यांचा बॉक्स जनुभाऊंच्या हातात ठेवला. जनुभाऊंनीही तत्परतेने मोदक व पेढा कारंड्यांना भरवला. हे पाहून सभासदांनी टाळ्यांच्या गजरात या मनोमिलनाला दाद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT