Panchnama Sakal
पुणे

कर्णफुलांवर भारी प्रेम; बायकोसमोर चुकला नेम!

कानात कर्णफूल घालणं, या पुरुषांच्या फॅशनचा जनक हा आमचा मित्र अजित आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे.

सु. ल. खुटवड

कानात कर्णफूल घालणं, या पुरुषांच्या फॅशनचा जनक हा आमचा मित्र अजित आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. विनोद कांबळीनेही त्याचे अनुकरण करून, प्रसिद्धी मिळवली. मात्र, याबाबत आपले प्रेरणास्थान अजितच आहे, हेही तो कबूल करतो, असे अजितनेच आम्हाला हजारवेळा सांगितले आहे. मात्र, ही फॅशन त्याला कशी सुचली, याची कहाणी मात्र दर्दभरी आहे. काही वर्षापूर्वी त्याची ऑफिसमधील सहकारी सुनंदा हिचा वाढदिवस जवळ आला होता. तिला काय भेट द्यावी, याचा विचार त्याच्या मनात घोळत होता. तसं त्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेमही जडलं होतं. काहीतरी महागडं प्रेझेंट देऊन, तिच्यावर इंप्रेशन पाडावं, अशी त्याची इच्छा होती. त्यातूनच तिला सोन्याचे कर्णफूल चांगली दिसतील व तिला आवडतील, असं त्याला वाटलं. नेमकी संध्या माहेरी गेल्याची संधी साधत त्याने दोन कर्णफुले खरेदी करून घरी आणून ठेवले. रात्री झोपण्यापूर्वी त्याने सुनंदाला ते कसे दिसतील, हे त्याने स्वतःच्या कानाला लावून पाहिले. चमचमणारी कर्णफुले पाहून, सुनंदा नक्कीच खूष होईल, याची त्याला खात्री वाटू लागली. पुढं स्वप्नांच्या रंगीबेरंगी दुनियेत तो हरवून गेला.

आपण दिलेली कर्णफुले कानात घालून, सुनंदा आपल्याकडे पाहून लाजत आहे, हेच स्वप्न त्याला सारखं पडत होतं. ज्यावेळी त्याला जाग आली व त्याने घड्याळ पाहिलं तर नऊ वाजून गेले होते. ‘आई गं मेलो. किती उशीर’ असं म्हणत तो जोरात बाथरुमकडे पळाला. पुढच्या पंधरा मिनिटात तो सगळं उरकून घराबाहेर पडला. दुपारी चार वाजता संध्याचा त्याला फोन आला.

‘अहो, ही सोन्याची कर्णफुले तुमच्या अंथरुणात कशी काय आली? खरं खरं सांगा. काय प्रकार आहे तो? मी माहेरी गेली असताना कोणाबरोबर रंग उधळत होता?’’ संध्याने त्याला चांगलेच धारेवर धरले.

‘अगं पण तू आजच कशी आलीस. उद्या येणार होतीस ना?’’ अजितने आवंढा गिळत विचारले.

‘का? तुम्हाला अजून मौजमजा करायची आहे? खरं खरं सांगा. ही कर्णफुले कोणाची आहेत?’’ संध्याने परत दम दिला. त्यावर खालच्या आवाजात तो म्हणाला, ‘‘अगं ती माझीच आहेत. कानात कर्णफुले घातल्यानंतर तुम्ही फार सुंदर दिसाल, असं कुंडलीशास्‍त्र जाणणारा माझा मित्र म्हणाला. शिवाय कर्णफुले घातल्यास माझ्यामागे लागलेली शनीची पीडाही दूर होईल. सगळ्या इडापिडा टळून, मी सुखी होईल, असं त्यानं सांगितल्याने मी ती खरेदी केली. घरी जाण्यापूर्वी अजितने दोन्ही कानांच्या पाळ्यांना दोन होल पाडून घेतले. घरी पोचल्यानंतरही घरातील वातावरण एकदम गरम होते. अजितने संध्याकडून कर्णफुले घेतली व कानात घातली. मी सुंदर दिसावा म्हणून नाही तर माझ्यामागील ग्रहदशा दूर व्हावी, इडापिडा टळावी, आपण सुखी व्हावं, यासाठी मी कर्णफुले घालत आहे.’’ अजितने खुलासा केला. त्यावर संध्याचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर मात्र त्याला रोजच ती कर्णफुले कानात घालावी लागू लागली. ऑफिसमध्ये त्याचा हा अवतार बघून सुनंदाही खूष झाली. ती म्हणाली, ‘‘तुमच्या कानातील ही कर्णफुले किती सुंदर आहेत. मी कित्येक वर्षांपासून त्याच्या शोधात आहेत. मला कोठे मिळालीच नाहीत.’’ अजित रोजच कानात कर्णफुले घालत असल्याचे पाहून त्याला आम्ही एकदा टोकले. त्यावर त्यावर त्याने ही दर्दभरी कहाणी ऐकवली. त्यावर आम्ही मोठ्याने हसून म्हणालो, ‘‘नशीब ! तू सुनंदासाठी कर्णफुलेच घेतलीस. सोन्याची नथ किंवा चांदीचे पैंजण घेतलं असतं तर तुझी काय अवस्था झाली असती?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

SCROLL FOR NEXT