Panchnama
Panchnama Sakal
पुणे

प्रेमाला उपमा नाही ते देवा घरचे देणे!

सु. ल. खुटवड

पंकजला आलेलं स्थळ पाहून सुलोचनाबाई भारावून गेल्या होत्या. त्याचं आयुष्य मार्गी लागल्याचं समाधान त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. आपल्याबरोबर भाजीपाला विकणारा, पहाटे लवकर उठून दूध आणि पेपर टाकणारा पंकज क्लासवन ऑफिसर झाला होता. पोरानं कष्ट आणि हुशारीच्या जोरावर आई-वडिलांचं नाव राखलं, याचा त्या माऊलीला केवढा अभिमान वाटू लागला.

‘अहो, ऐकलंत का? आपल्याला सून नक्षत्रासारखी भेटलीय.’’ घरी पोचल्यावर आपल्या पतीचा हात हातात धरून सुलोचनाबाई सूनबाईंचं कौतुक करू लागल्या. त्यांचा चेहरा आनंदानं न्हाऊन निघाला होता. हे ऐकून त्यांच्या पतीचेही डोळे लकाकले. काहीतरी बोलायचा ते प्रयत्न करू लागले. बऱ्याच प्रयत्नांनी ‘छाऽ ऽन’ असा शब्द ते बोलल्याचं सुलोचनाबाईंना वाटलं.

‘पंकज, तुझे बाबा ‘छान’ बोलले.’’ पंकजबरोबर एकवीस वर्षांचा सूरजही तिथे आला. ‘‘आई, मला एकल्याला छोडून कुतं गेल्ती. मी कित्ती गाबरलो आणि वहिनी कुठंय?’’ सूरजनं असं म्हटल्यावर सुलोचनाबाईंनी त्याला छातीशी कवटाळलं.

वीस वर्षांपासून पंकजचे बाबा मेंदूच्या पक्षाघाताने अंथरुणाला खिळून आहेत. सूरजही विशेष मुलगा आहे. सुलोचनाबाईंना वीस वर्षांपूर्वीचा तो काळा दिवस आजही आठवतो. महापालिकेच्या अंगणवाडीत सुलोचनाबाई सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्या दिवशीही त्या सकाळीच अंगणवाडीवर गेल्या होत्या आणि इकडे बाथरूममध्ये पडल्याचं निमित्त होऊन पंकजचे बाबा कोमात गेले होते. तेव्हापासून सुलोचनाबाईंची तारेवरची कसरत सुरू झाली. रोज सकाळी नवऱ्याचं आवरून त्या बालवाडीत जात. तेथील तुटपुंज्या पगारावर घर चालवणं अवघड होऊ लागलं म्हणून त्या रस्त्यावर बसून भाजीपाला विकू लागल्या. या धावपळीत त्यांना सर्वार्थाने साथ दिली ती पंकजने. सुलोचनाबाईंना सगळं आठवल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. दोन दिवसांनी स्नेहलच्या वडिलांनी पंकजला भेटण्यासाठी बोलावले. ते म्हणाले, ‘‘पंकजराव, तुम्ही जावई म्हणून पसंत आहात. स्नेहल ही माझी एकुलती एक मुलगी आहे. माझी कोट्यवधींची प्रॉपर्टी तुमचीच होणार आहे. मात्र, लग्नानंतर तुम्ही स्वतंत्र राहायला हवे. माझी मुलगी तुमच्या आई-वडिलांसोबत राहणार नाही.’’

त्यावर शांतपणे पंकज म्हणाला, ‘‘मी सात- आठ वर्षांचा असल्यापासून माझ्या आईने अपार कष्ट सोसलेत. भविष्यात सगळा अंधार दाटला असताना, परिस्थितीला शरण न जाता ती लढत राहिली. संघर्ष करत राहिली. उद्याची स्वप्नं ती माझ्यात पाहत राहिली आणि आता कुठं मी तिला सुखाचे दिवस दाखवू इच्छितो. तर तुम्ही या अटी लादताय. माझे वडील अंथरुणाला खिळलेत, माझा भाऊ विशेष मुलगा आहे, माझी आई साधी-भोळी आहे पण ही माणसं माझी आहेत. त्यांना मी कधीही अंतर देणार नाही. तुम्ही लग्न मोडलं तरी चालेल.’’ असं म्हणून पंकज घरातून बाहेर पडला. त्यावेळी स्नेहल पाठीमागून पळत आली.

‘पंकज, मला तुमच्याशीच लग्न करायचं. जो मुलगा आई-वडील व भावाला अंतर देऊ इच्छित नाही. तो मलाही तेवढंच प्रेम देईल, याची मला खात्री आहे.’’ असे म्हणून ती त्याला बिलगली. दोघांच्याही डोळ्यांतील अश्रूंचा वर्षाव स्नेहलचे वडील बाल्कनीतून निमूटपणे पाहत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चीनच्या ताब्यातील जमीन परत मिळवणार ते मोफत वीज अन् उपचार; केजरीवालांच्या देशवासीयांना 10 गॅरंटी

Heeramandi : दारू पिऊन डान्स अन् 99 टेक्स; रिचाने सांगितला 'हिरामंडी'मधील गाण्यावरील नृत्याच्या शूटिंगचा किस्सा

MBBS: खोटी माहिती देत 'एमबीबीएस'ला प्रवेश, तरीही हायकोर्टाने फेटाळली पदवी रद्द करण्याची याचिका; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Eknath Khadse: "मी निवडणूक लढवणार नाही, पण..." राजकीय संन्यासाबाबत एकनाथ खडसे थेटच बोलले

Latest Marathi News Live Update : दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT