Panchnama
Panchnama Sakal
पुणे

नद्यांना घालताय सीमाभिंती; सोसायटीवरही हवी ताडपत्री

सु. ल. खुटवड

‘पुराचे पाणी आपल्या सोसायटीत येऊ नये म्हणून २० फूट उंच वाॅटरप्रुफ कपाउंड केलं पाहिजे व त्यावर ‘माझा पूर, माझी जबाबदारी’, असं लिहलं पाहिजे. तसेच पावसाचे पाणी सोसायटीच्या आवारात व गच्चीत साचून डेंगीचे डास तयार होतात, यासाठी संपूर्ण सोसायटीच्या वर ताडपत्री अंथरली पाहिजे,’’ जनुभाऊंनी मासिक सभेत जोरदार मुद्दा मांडला. ‘समुद्र व नदीकिनारी सीमाभिंत बांधून आगामी काळातील पूर रोखणार’, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी नुकतेच दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सोसायटीत पूर येऊ नये, यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात बैठक आयोजित केली होती. त्यावेळी जनुभाऊ बोलत होते.

‘अहो, सीमाभिंत व ताडपत्रीचा खर्च करण्याची आपल्या सोसायटीची आर्थिक ऐपत नाही. त्यामुळे हे होऊ शकणार नाही,’’ अध्यक्ष कारंडे यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यावर जनुभाऊ एकदम तडकलेच. ‘‘म्हणजे? आम्ही एवढा मेंटेनन्स दर महिन्याला देतो, त्याचे तुम्ही करता काय? आमच्या कष्टाच्या पैशांतून तुम्ही तुमचा संसार चालवता की काय? मी याचा तीव्र निषेध करतो. दुसरं असं की सगळ्या नद्यांना सीमाभिंत घालणं सरकारला जमू शकतं तर आपल्या सोसायटीला सीमाभिंत व ताडपत्री लावणे का जमत नाही. त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजेल. शिवाय अंगात धमक आणि कर्तृत्वही हवं; पण अध्यक्षांकडे या तिन्ही गोष्टी नाहीत. माझ्याकडे या गोष्टी आहेत. पण, मला अध्यक्ष कोणी करत नाही,’’ जनुभाऊंनी मनातील सल बोलून दाखवली.

‘हे बघा, दर महिन्याला सोसायटीकडे मेंटेनन्सचे ३० हजार रुपये जमा होतात. त्यातून दोन सिक्युरिटी गार्डचा पगार, वीजबिल, सफाई कामगारांचा पगार हेच भागवता भागवता नाकीनऊ येतात. त्यातून हा नवा खर्च कसा करणार’’? कारंडे यांनी म्हटले. ‘‘तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अध्यक्षपदाचा राजीनामा द्या,’’ जनुभाऊंनी नेहमीची आपली मागणी पुन्हा रेटली. ‘‘त्यापेक्षा सोसायटीला झेपेल अशा मागण्या करा.’’ कोंढेकर म्हणाले. त्यावरुन उसळून जनुभाऊ राणे स्टाईलमध्ये म्हणाले, ‘‘तू गप्प रे. मध्ये-मध्ये बोलू नकोस.’’ त्यावर सगळीच सभा अवाक् झाली. ‘‘आमच्या पार्किंगच्या प्रश्नाचं घोंगडं किती वर्षापासून भिजत पडलंय. कोणीही येतं आणि आमच्या पार्किंगमध्ये गाडी लावून जातं. त्यामुळे आता प्रत्येकाच्या पार्किंगला सोसायटीने सीमाभिंत बांधून दिली पाहिजे, अशी मागणीही जनुभाऊंनी केली. कधीही पूर येईल म्हणून सोसायटीने होड्या खरेदी केल्या पाहिजेत. समजा पूर आलाच नाही तरीदेखील पुण्यातील मोठमोठ्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यांतून होड्यांचा वापर करता येईल, अशी एक सूचना दिवेकरांनी केली. मात्र, कारंडे यांनी त्याकडेही दुर्लक्ष केले.

‘सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मच्छर होऊ नयेत म्हणून सोसायटीकडून डीडीटी पावडर फवारली जाईल, दोन ठिकाणचे ड्रेनेजपाईप बदलले जातील व पार्किंगचे पट्टे मारले जातील. सोसायटीला एवढेच काम करता येणे शक्य आहे, कारंडे यांनी असं म्हणताच सभेत गोंधळ माजला. ‘सीमाभिंत व ताडपत्रीचे काम झालंच पाहिजे’, ‘अकार्यक्षम अध्यक्ष हाय हाय,’ ‘जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’ या जनुभाऊंनी दिलेल्या घोषणा दुमदुमल्या. मात्र, या गोंधळातच सभेचे कामकाज संपुष्टात आल्याचे कारंडे यांनी जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT