Panchnama Sakal
पुणे

हमालीच्या ओझ्याने अनाथांचा भार हलका!

मार्केटयार्डमध्ये हमालाने दोन पिशव्यांची हमाली पन्नास रुपये मागितल्याने नीलेशला भयंकर राग आला.

सु. ल. खुटवड

मार्केटयार्डमध्ये हमालाने दोन पिशव्यांची हमाली पन्नास रुपये मागितल्याने नीलेशला भयंकर राग आला.

मार्केटयार्डमध्ये हमालाने दोन पिशव्यांची हमाली पन्नास रुपये मागितल्याने नीलेशला भयंकर राग आला.

‘एवढुशा दोन पिशव्या गेटबाहेर आणल्या तर पन्नास रुपये कसले मागतोस? असे पैसे कमवलेस तर लवकरच तुझा बंगला होईल. वीस रुपये फार झाले.’ असे म्हणून नीलेशने वीस रुपये त्याच्या हातावर टेकवले. नीलेश पुढे गेल्यानंतर हमालाने त्याला थांबवले. ‘‘साहेव, मगाशी तुम्ही सफरचंद घेतले आणि दोन हजारांची नोट विक्रेत्याला दिली आणि उरलेले पैसे न घेताच दुसऱ्या गाळ्यावर गेलात. त्या विक्रेत्याकडून मी सोळाशे रुपये तुम्हाला द्यायला घेतले होते. हे घ्या.’’ असे म्हणून त्याने नीलेशच्या हातावर पैसे ठेवले. त्याचा हा प्रामाणिकपणा पाहून नीलेश अवाक झाला. पन्नास रुपये त्याने मागितले म्हणून आपण त्याच्यावर रागावलो होतो, हे आठवून तो खजिल झाला. शेजारच्या टपरीवर चहा पितापिता त्याने हमालाची आत्मीयतेने चौकशी केली.

आपले नाव पंढरीनाथ असून, बारा वर्षांची मुलगी व आठ वर्षांच्या मुलासह ते जनता वसाहतीतील एका झोपडीत राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘साहेब, माझी दोन्ही मुले इंग्रजी शाळेत शिकतात. मी अंगठाबहाद्दर आहे पण माझी मुलं फाडफाड इंग्रजी बोलतात, याचं मला फार समाधान आहे. दोघांची चाळीस हजार रुपये फी भरायची आहे. तीस हजार रुपये मी जमा केलेत. दहा हजार रुपये कमी पडत आहेत. त्यामुळे उशिरापर्यंत थांबून मी हमाली करतो.’’ पंढरीनाथने आपला जीवनप्रवास उलगडून दाखवला.

‘अहो मग मघाशी सोळाशे रुपये मला परत कशाला दिले?’’

‘साहेब, अशी हरामाची कमाई काय कामाची? माझ्या मुलांच्या शिक्षणाला हे पैसे पावले नसते. मी माझ्या मुलांना कष्टाच्या कमाईतूनच शिकवणार तरच ते त्यांच्या अंगी लागेल ना?’’ पंढरीनाथचे बोलणे ऐकून नीलेश भारावला. जनता वसाहतीमधील पत्ता घेऊन, तो मार्गस्थ झाला.

दोन दिवसांनी पंढरीनाथची झोपडी शोधत नीलेश घरी पोचला. त्यांची दोन्ही मुले अभ्यासात मग्न होती व पंढरीनाथ स्वयंपाक करीत होते.

‘तुम्ही स्वयंपाक करताय? मुलांची आई...’’ नीलेशने चाचरत विचारले. त्यावर दुःखाचा आवंढा गिळत पंढरीनाथ म्हणाले, ‘‘कोरोनामुळे गेल्यावर्षी माझी बायको देवाघरी गेली. आम्हाला मूल-बाळ नव्हतं.’’

‘मग ही दोन्ही मुलं?’’ नीलेशने विचारलं.

‘मार्केटयार्डमधील कचराकुंडीत एक महिन्याची असताना लक्ष्मी मला रडताना दिसली. कोणीतरी तिला टाकून दिलं होतं. मी तिला उचलली आणि शेजारच्या पोलिस ठाण्यात घेऊन जाऊ लागलो. तेवढ्यात ती जोरात रडली व माझ्या शर्टाला घट्ट पकडलं. हे पाहून मला गलबलून आलं. तिचा सांभाळ करायचा, असं मी ठरवलं. माझं वागणं बेकायदेशीर होतं पण मुलीच्या भविष्यासाठी एवढी रिस्क मी घेतली. माझ्या बायकोनंही लक्ष्मीला जीव लावला तर शेजारच्या चौकात भीक मागताना तीन वर्षांचा अशोक दिसला. शाळेत जाणाऱ्या मुलांकडं तो आशाळभूत नजरेने बघत होता. ‘तुला शाळा शिकायचंय का?’ असं मी त्याला विचारलं आणि हसऱ्या नजरेने त्याने होकार दिला. तो अनाथ होता. मग मी त्यालाही घरी आणलं आणि बालवाडीत घातलं.’’

‘साहेब, मी अंगठाबहाद्दर आहे पण माझ्या मुलांनी खूप शाळा शिकावी, असं माझं स्वप्न आहे. पहाटे चार ते दुपारी दोनपर्यंत मी हमाली करतो. वाट्टेल तेवढे कष्ट करतो पण मुलांना काहीही कमी पडू देत नाही. मुलांना पुढं कसला त्रास होऊ नये म्हणून मी पुन्हा लग्न न करायचं ठरवलंय.’’ हे सांगताना पंढरीनाथच्या डोळ्यांत अश्रू दाटले.

नीलेशने काहीही न बोलता दहा हजार रुपयांचा बंडल पंढरीनाथच्या हातात ठेवला. ‘मुलांची फी भरा’ असं म्हणत साश्रूनयनांनी तो घराबाहेर पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT