Panchnama Sakal
पुणे

Panchnama : भांडणे लावली शेजारी गेम झाली लयभारी!

‘ही सुजाता कोण आहे? आणि तिने तुम्हाला नेमकं ‘व्हॅलेंटाइन डे’ ला पुष्पगुच्छ, चॉकलेट आणि ‘शंतनू, लव यू- सुजाता’ असं लिहिलेलं ग्रीटिंगकार्ड का पाठवलं?’ मानसीने शंतनूवर प्रश्नांचा भडिमार केला.

सु. ल. खुटवड

‘ही सुजाता कोण आहे? आणि तिने तुम्हाला नेमकं ‘व्हॅलेंटाइन डे’ ला पुष्पगुच्छ, चॉकलेट आणि ‘शंतनू, लव यू- सुजाता’ असं लिहिलेलं ग्रीटिंगकार्ड का पाठवलं?’ मानसीने शंतनूवर प्रश्नांचा भडिमार केला.

‘ही सुजाता कोण आहे? आणि तिने तुम्हाला नेमकं ‘व्हॅलेंटाइन डे’ ला पुष्पगुच्छ, चॉकलेट आणि ‘शंतनू, लव यू- सुजाता’ असं लिहिलेलं ग्रीटिंगकार्ड का पाठवलं?’ मानसीने शंतनूवर प्रश्नांचा भडिमार केला. ‘अगं कोण सुजाता? मी अजिबात ओळखत नाही.’ शंतनूने तिचा प्रश्न झटकला. त्यावर तिने आज सकाळी दाराबाहेर ठेवलेला पुष्पगुच्छासह ग्रिटींगकार्ड दाखवलं.

‘मी पुराव्याशिवाय बोलत नाही. आता बोला ही सुजाता कोण?’ मानसीने विचारले. ‘अगं तुझ्या गळ्याशपथ मी कोणत्याही सुजाताला ओळखत नाही.’ शंतनूने म्हटले. ‘‘खबरदार! माझी शपथ घ्याल तर. मला माहिती आहे, माझी शपथ घेतल्यानंतर मी मरून जावे, अशी तुमची इच्छा आहे. त्यानंतर तुमच्या दोघांना रान मोकळं मिळेल.’ मानसीने रागाने म्हटले. ‘माझ्यावर वाट्टेल तो संशय घेऊ नकोस. मी अतिशय साधा-भोळा आणि सरळमार्गी माणूस आहे.’ शंतनूने म्हटले.

‘व्वा! स्वतःच स्वतःला सर्टिफिकेट देऊन मोकळा झालात. पण मी तुम्हाला चांगलंच ओळखून आहे. ‘खाली मुंडी आणि पाताळधुंडी’ असा तुमचा स्वभाव आहे, हे मला माहिती आहे.’ मानसीने असं म्हटल्यावर शंतनूही इरेला पेटला. शब्दाने शब्द वाढत गेला. ‘माझ्यापेक्षा तुझ्या भांडणाचा स्टॅमिना जास्त आहे कारण माहेरून तेच शिकून आली आहेस. मला मात्र लहानपणापासून कोणी भांडायलाच शिकवलं नाही.’ शंतनूने असं म्हटल्यावर पुन्हा वादाची ठिणगी पडली. भांडणात आपला पराभव दिसू लागताच त्याने काढता पाय घेतला. शंतनू घराबाहेर पडल्यानंतर मानसीने आईला फोन केला. सकाळी आलेला पुष्पगुच्छ व ग्रिटींग कार्ड यासंबंधी तिने तासभर माहिती दिली व त्यावरून झालेल्या भांडणाचे वर्णन तिने आणखी तासभर केले.

‘आई, मला त्यांच्याबरोबर राहायचं नाही. मी तीन-चार महिन्यांसाठी माहेरी येतेय.’ मानसीने रडत म्हटले. ‘अगं वेड्यासारखं असं काही करू नकोस. तू माहेरी आल्यावर जावईबापू आनंदोत्सव साजरा करतील कारण यात त्यांचाच फायदा आहे. त्यांनी भांडण केलंय ना मग शिक्षाही त्यांनाच मिळायला हवी.’ मानसीच्या आईने सांगितले. त्यावर मानसी म्हणाली, ‘आई, त्यांनी सुजाताचा नाद सोडला पाहिजे व माझ्याशी भांडल्याची शिक्षाही त्यांना मिळाली पाहिजे, यासाठी मी काय करू?’ त्यावर तिची आई म्हणाली, ‘तू काहीच करायचं नाही. तू माहेरी येऊ नकोस. मीच सहा महिने तुझ्याकडे राहायला येते. एवढी शिक्षा त्यांना पुरेशी आहे. मी नाशिकवरून लगेच निघते.’ असे म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. संध्याकाळी शंतनू टीव्ही पहात असतानाच दोन मोठ्या बॅग घेऊन, सासूबाई घरात आल्या.

‘जावईबापू, राहायला या, असं तुम्ही सारखं म्हणत होता ना. आता मी चांगली सहा महिन्यांसाठी राहायला आली आहे. जावईबापूंचा मान राखायचा नाही तर कोणाचा राखायचा,’ सासूबाईंनी असं म्हटल्यावर शंतनूने आवंढा गिळला. थोड्या वेळाने त्याने व्हॉटसॲप चेक केले. श्रीधरचा मेसेज वाचला. ‘काल माझ्या घरी येऊन, घरातील सगळी कामं मी कशी करतो, हे माझ्या बायकोला तासभर सांगून आमच्यात भांडणे लावून दिलीस. त्याचा बदला म्हणून मीच सुजाता या नावाने पुष्पगुच्छ पाठवला होता. आजचा व्हॅलेंटाइन डे कसा झाला. जाम भांडण झालं ना? झालंच पाहिजे. दुसऱ्यांच्या घरात भांडण लावून दिल्यावर आपल्या घरातही भांडणे होतात, एवढे लक्षात ठेवावे.’ मेसेज वाचल्यावर शंतनूने डोळे मिटून घेतले. ‘श्रीधर, तू आमच्यात लावून दिलेल्या भांडणाची शिक्षा मला सहा महिने भोगावी लागणार आहे रे.’ डोक्याला हात लावत शंतनू पुटपुटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT