पुणे

समांतर हॅरिस पुलावर लवकरच स्लॅब

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - हॅरिस पुलाला समांतर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या शेवटच्या गर्डरचा स्लॅब टाकण्याची तयारी महापालिकेने सुरू केली असून, महिन्याभरात ते काम पूर्ण होईल. नवीन पुलाच्या पुणे बाजूकडील पोच रस्त्याचे कामही सुरू झाले आहे.

हॅरिस पुलाला दोन्ही बाजूंना दोन समांतर पूल होत असल्याने, तसेच सीएमईसमोरील सबवेचे काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे लवकरच या भागातील कोंडीची समस्या दूर होणार आहे. पिंपरीकडून पुण्याकडे येणाऱ्या समांतर पुलावरून गेल्या वर्षी वाहतूक सुरू झाली. पुलाच्या मार्गावरील बोपोडीतील झोपड्यांचे स्थलांतर झाल्यानंतर तेथील पोच रस्त्याचे आणि पुलाचे काम महापालिकेने हाती घेतले.

महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप ओंबासे म्हणाले, ‘‘नदीवरील पुलाचे काम आधीच पूर्ण झाले असून, नदीकाठच्या रस्त्यावरून जाणाऱ्या शेवटच्या गर्डरचे काम हाती घेतले आहे. क्राँक्रीट स्लॅब टाकण्यात येईल. पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकांनी संयुक्तरीत्या हा प्रकल्प मे २०१६ मध्ये हाती घेतला. प्रकल्पाचा खर्च २२ कोटी ४६ लाख रुपये आहे. हॅरिस पुलाला समांतर असलेला पूल मार्चच्या अखेरीला वाहतुकीसाठी खुला होईल. त्यामुळे पुण्याकडून पिंपरीच्या दिशेने येण्यासाठी चार लेन उपलब्ध होतील. पोच रस्त्याचे काम फेब्रुवारी अखेरीला पूर्ण होईल. पुलाचे संरक्षक कठडे, पदपथ, विद्युतविषयक कामे मार्चमध्ये पूर्ण करण्यात येतील.’’

आकडेवारी 
प्रकल्पाचा खर्च २२.४६ कोटी रुपये
पुलाची लांबी २०२ मीटर
पुण्याकडील पोच रस्त्याची लांबी १४५ मीटर
पिंपरीकडील पोच रस्त्याची लांबी ६५ मीटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT