वडारवाडी - नैतिक मूल्य शिक्षणाचे धडे घेणारी झोपडपट्टीतील मुले. 
पुणे

नैतिक मूल्य शिक्षणाची शाळा

पूजा ढेरिंगे

पुणे - शिक्षणापासून वंचित असलेल्या वडारवाडी झोपडपट्टीतील मुलांना प्रा. आरती घुले या नैतिक मूल्य शिक्षणाचे धडे देत आहेत. व्हीजन नर्सरी स्कूलमध्ये त्या शिक्षिका असून, उन्हाळी सुटीत स्वतःच्या बंगल्यात त्यांनी ही शाळा सुरू केली. या शाळेत ३६ गरीब मुले शिक्षण घेत आहेत.

प्रा. घुले म्हणाल्या, ‘पहिल्याच प्रयत्नात एवढ्या मुलांना शिकवणे आणि याचा त्रास आवारातील लोकांना होऊ न देणे,’ हे आव्हान होते. परंतु, हळूहळू सगळेच जमले. शाळेत उठण्या-बसण्याची पद्धत, शिस्त, शिष्टाचार, इंग्रजीचे धडे, व्यक्तिमत्त्व विकास, मेंदूचा विकास (ब्रेन डेव्हलपमेंट ॲक्‍टिव्हिटी), हे शिक्षण मुलांच्या आवडीचे बनले. गाणी, गप्पा, गोष्टींतून शिक्षण द्यायचे, असा शाळेचा अभ्यासक्रम ठरविला. मुलांमधील कलागुण ओळखून मी त्यावर काम करू लागले. विशेष म्हणजे मुलांना नवे शिकण्याची इच्छा होती. त्यामुळे ते माझ्याकडून शिक्षणाचा फायदा करून घेऊ लागले.’

त्या म्हणाल्या की, सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मुलांना विनामूल्य शिक्षण देण्यास सुरवात केली. केवळ पाच दिवसांत मुलांची संख्या ३६ झाली. झोपडपट्टीमध्ये राहत असल्यामुळे मुलांवर कमी वयात जबाबदारी पडते. त्यामुळे आठ ते बारा वयातच ते स्वावलंबी जीवन जगतात. आई-वडील दिवसभर कष्टाची कामे करतात. थकल्यामुळे मद्याच्या नशेत ते झोपतात.

त्यामुळे ही कोवळ्या वयातील मुले मद्याचे अड्डे, सिगारेट आणि नशेच्या पदार्थांच्या सानिध्यात राहिल्यामुळे नशा करू लागतात. त्यामुळे मुलांची विचारशक्ती कमकुवत होते. ती प्रेमाची भुकेलेली असतात. अशा परिस्थितीत त्यांना पैशाची नव्हे, तर आपला अमूल्य वेळ देऊन मदत करणे गरजेचे असते, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील विविध ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT