shop.jpg 
पुणे

छोटे व्यावसायिक चिंताग्रस्त झालेत कारण...

सकाळवृत्तसेवा

रामवाडी (पुणे) : कोरोनाचा वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आल्याने दोन महिन्यात अनेक छोट्या व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे. पाचव्या लॉकडाउनमध्ये प्रतिबंधित क्षेत्र सोडून काही ठिकाणी पुन्हा व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळाली असून ही व्यावसायिकांना सध्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांची वाट पाहावी लागत असल्याने घरखर्च, शैक्षणिक खर्च व इतर खर्च कसा भागवायचा ह्या चिंतेने ते त्रस्त झाले आहेत.


गुढीपाडवा, हनुमान जयंती, रामनवमी, अक्षयतृतीया या दोन महिन्यात आलेले सण तसेच लग्नसराई सत्यनारायण पूजा अशा अनेक धार्मिक कार्यक्रमात पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली असायची पण गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुजेचे साहित्य दुकाने ऐन सिझनला बंद ठेवावी लागल्याने हातावरचं पोट असणाऱ्या व्यवसायिकांचे दोन महिन्याचे नुकसान झाले आहे. 

चंदननगर भाजी मार्केट येथे नारळ, लाहया, बत्तासे, अगरबत्ती, समिधा, कापूर, उदी, पान, सुपारी, हळकुंड, अष्टगंध, भस्म, हळदी-कुंकू सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहकांची खूप गर्दी होत असे पण सध्या कोरोनाच्या भीतीने अनेक ग्राहक गर्दीचे ठिकाण टाळत आहे. रोज पूजेचे साहित्य खरेदीसाठी तुरळक स्वरूपात ग्राहक येत असल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

 

चंदननगरमध्ये 25 वर्षापासून मी पूजेचे साहित्य विक्री व्यवसाय करतो. दिवसाला एक हजार नारळ व नागवेलीच्या पानाची विक्री होत असायची त्याच बरोबर पूजेचे साहित्य विकले जात होते पण या दोन महिन्यात दुकान बंद ठेवावं लागल्याने माझे 25 ते 30 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. 

-रामनाथ कावळे, व्यावसायिक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT