Bala-Bhegade
Bala-Bhegade 
पुणे

छोटी धरणे, तलावाबाबत अधिकारी अनभिज्ञ - बाळा भेगडे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात पाटबंधारे खात्याची छोटी धरणे, तलाव किती आहेत, याबाबतची माहिती दस्तुखुद्द पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना बुधवारी देता आली नाही. त्यामुळे वैतागलेल्या कामगार, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘जिल्ह्यातील सर्व धरणे तसेच छोटे-मोठे तलाव यांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करा,’ अशा सूचना त्यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या.

कोंढवा आणि आंबेगाव येथील दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर भेगडे यांनी सर्व संबंधित खात्यांची बैठक बोलविली होती. चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्याच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी ‘जिल्ह्यात लहान-मोठे पाटबंधारे प्रकल्प किती आहेत,’ अशी विचारणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. 

मात्र अधिकाऱ्यांना याची आकडेवारी देता आली नाही, त्यामुळे भेगडे यांनी धरण फुटण्याच्या दुर्घटना घडू नये, यासाठी सर्व्हे करावा. 

लहान -मोठ्या धरणांबरोबरच जिल्ह्यातील मातीच्या बंधाऱ्यांचाही सर्व्हे करा आणि त्याचा अहवाल सादर करा. हे करताना ज्या धरणांमधून अथवा तलावांमधून गळती होत आहे, तसेच जी धरणे धोकादायक आहेत, त्यांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट तातडीने करा, अशा सूचना दिल्या.

एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना घेतले फैलावर 
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटनस्थळे आहेत. पावसाळ्यात या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होते. हे विचारात घेऊन पर्यटनस्थळांवरील सुरक्षाव्यवस्थेसंदर्भात अहवाल तयार करावा, तसेच धोकादायक ठिकाणे निश्‍चित करावीत, तसेच त्या ठिकाणी सूचना फलक लावावेत, असे आदेश यापूर्वी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एमटीडीसीला दिले होते. मात्र, एमटीडीसीकडून त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. आज बैठकीत त्यावरून भेगडे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT