small girl dies in leopard attack at shiroli village junnar pune Sakal
पुणे

Leopard Attack : शिरोली खुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलीचा मृत्यू

शिरोली खुर्द ता. जुन्नर येथील पाटील मळा वस्तीवरील संपत केरू मोरे या शेतकऱ्याच्या शेतात वास्तव्यास असलेल्या मेंढपाळांची लहान मुलगी बिबट्याने पळवून नेली असल्याची माहिती पोलिस पाटील विक्रम मोरे यांनी दिली.

अमोल थोरवे

ओझर : शिरोली खुर्द ता. जुन्नर येथील पाटील मळा वस्तीवरील संपत केरू मोरे या शेतकऱ्याच्या शेतात वास्तव्यास असलेल्या मेंढपाळांची लहान मुलगी बिबट्याने पळवून नेली असल्याची माहिती पोलिस पाटील विक्रम मोरे यांनी दिली.

हि घटना गुरूवार ता. ११ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार आई वडीलांच्यामध्ये झोपलेली संस्कृती संजय कोळेकर हि अंदाजे दिड ते दोन वर्षांची मुलगी बिबटयाने उचलून नेल्याची माहिती वन विभागाला प्राप्त झाल्या बरोबर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

तसेच गावातील व परिसरातील नागरिकही मोठया संख्येने जमले. त्यांनी आजूबाजूच्या शेतात मुलीचा शोध घेतला. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेतला असता ऊसाच्या शेतातून इकडून तिकडे पळाला असल्याचे निदर्शनास आले. तसेच एका शेताच्या जवळ मुलीच्या डोक्यातील टोपडे, फ्रॉक आढळून आला.

तेथील परिसरातील शेतात शोध घेतला असता सुभाष थोरात व विश्वास जाधव यांच्या ऊसाच्या शेताच्या बांधावर मुलीच्या डोक्याची कवटीची हाडे व उजव्या पंजाचा काही भाग आढळून आला. उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर,सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी पंडीत थोरात,सागर शिंदे यांच्या पोलिस पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्राप्त अवशेष शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच जुन्नरचे आमदार अतुल बेनके विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष घटनास्थळी पोहचले. या परिसरात बिबटयाचा उपद्रव हा नागरिकांसाठी डोकेदुखीचा विषय असून वन विभागाने याबाबत ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT