पाटणमधील ५० अंगणवाड्या होणार स्मार्ट
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या पाठपुराव्याला आले यश
मोरगिरी, ता. २ : पाटणसारख्या डोंगरी व दुर्गम तालुक्यात असणाऱ्या अंगणवाड्यातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांच्या विभागाकडे ५० स्मार्ट अंगणवाड्या मंजुरीसाठी शिफारस केली होती. मंत्री देसाई यांचे पाठपुराव्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी तालुक्यातील ५० अंगणवाड्यांना निधी मंजूर झाला.
त्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाचे महिला व बाल विकास विभागाने पारित केला आहे. एकाच वेळी पाटण तालुक्यातील ५० स्मार्ट अंगणवाड्या होणार असल्याने त्यांचा चेहरामोहरा बदलून विद्यार्थ्यांना आनंददायी व शैक्षणिक वातावरण तयार होण्यास मदत होईल. या अंगणवाडीत मुलांना आनंददायी वातावरणात पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, तसेच किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित करता येईल. यासाठी अंगणवाड्यांचा दर्जा सुधारून व त्यांच्या पायाभूत सोयी सुविधांत वाढ करून त्यांना स्मार्ट अंगणवाडीत रूपांतरित करण्याचे शासन विचाराधीन होते. त्यानुसार मंत्री देसाई यांनी मतदारसंघातील प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून मंत्री तटकरे यांच्याकडे स्मार्ट अंगणवाडीसाठी निधी मंजूर होण्यासाठी शिफारस केली होती.
स्मार्ट अंगणवाडी योजनेंतर्गत ई लर्निंग, वॉटर प्युरिफायर, हँडवॉश बेसिन सुविधा, स्वयंपाकगृहाचे आधुनिकीकरण, अंगणवाडी रंगरंगोटी व केंद्राची किरकोळ दुरुस्ती होणार असल्याने या अंगणवाड्यांचे रुपडे बदलण्यास मदत होणार आहे.
.........
चौकट
........
यांचा असेल समावेश
आंबेघर तर्फ मरळी, आटोली पुनर्वसन, भालेकरवाडी, कोरिवळे २२, सातर, वर्पेवाडी सळवे, मान्याचीवाडी २३०, धनगरवाडा काळगाव २६९, वरचे हेळवाक, किसरुळे बी, काढोली, बाजे मारुल ६४, डोंगरुबाचीवाडी ३७९, कवठेकरवाडी, सुभाषनगर २७०, येराडवाडी ३४३, ऊरुल ३३२, डेरवण, माजगाव ३१३, घाणबी, सोनवडे ११०, वाघाचा मळा, आसवलेवाडी, जाधववाडी मेंढ १९२, वरचे घोटील, एकावडेवाडी सळवे, करपेवाडी काळगाव, मस्करवाडी धामणी, ढाणकल मुस्लिमवस्ती, वाघणे, शेळकेवस्ती ६६, चिटेघर २२३, सडादुसाळे, काळेवाडी २६२, पांढरवाडी नाडे २७५, गणेवाडी ३३०, माथणेवाडी चाफळ, खोणोली, जाईचीवाडी, तारळे १५४, कुशी पुनर्वसन ३८०, कोंजवडे १३१, मरळोशी १४२, मोडकवाडी जिंती, सडावाघापूर, आवर्डे १३६, वेखंडवाडी नवीन १७०, जंगमवाडी, चाफळ ३०८ व मराठवाडी.
..................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.