पुणे

स्मार्ट सिटीच्या आकडेवारीत विसंगती;कोरोना रुग्णसंख्येबाबत खातरजमा करण्याचा आदेश

सकाळवृत्तसेवा

पुणे - महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन यांच्याकडील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीकडून प्रसिद्ध होत असलेल्या मॅपमधील आकडेवारीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी आकडेवारी पुन्हा- पुन्हा तपासण्याचा आदेश स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिला आहे. 

स्मार्ट सिटी प्रशासनाकडून रुग्णांच्या संख्येचा आढावा घेणारा नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. शहरात सुमारे ४२ प्रभाग आहेत. १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ते समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यात धनकवडी - सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या प्रभागांत (क्र. ३५, ३९, ४०, ४२) ४ आणि ५ मे रोजी १२४ रुग्ण असल्याचे दाखविण्यात आले आहे. तर, १ ते ३ मे रोजी प्रत्येकी १२१ रुग्ण असल्याचे म्हटले होते. मात्र, २६ ते २९ एप्रिल दरम्यान दररोज ६२ ते ६४ रुग्ण असल्याचे म्हटले आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका, स्मार्ट सिटीतील अधिकाऱयांबरोबर ३० एप्रिल रोजी बैठक आयोजित केली होती. त्यामुळे त्या दिवशी स्मार्ट सिटी प्रशासनाने नकाशा प्रसिद्ध केला नाही. मात्र, १ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या नकाशात धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारितील चार प्रभागांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६४ वरून १२१ वर पोचल्याचे दिसून आले. सुमारे ५७ रुग्ण कोठून वाढले, असा प्रश्न येथील लोकप्रतिनिधींना पडला. स्थानिक नगरसेवक विशाल तांबे यांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून, आरोग्य विभागाकडून आकडेवारी गोळा केली तेव्हा या चारही प्रभागांतील रुग्ण संख्या सुमारे ७० असल्याचे दिसून आले. त्यांची यादीही त्यांनी मिळविली. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनाकडे १२१ रुग्णांबाबत विचारणा केली असता, ते खुलासा करू शकले नाही. तांबे यांनी हे तपशील ‘सकाळ’कडे दिले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नगरसेवक तांबे म्हणाले, ‘‘कोरोनाची रुग्णांच्या आकडेवारीत गफलत झाल्याचे दिसून आले. महापालिकेच्याच आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सध्या आमच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंर्तगत राहणारे ७० रुग्ण आहेत. त्यात प्रभाग ३५ मधील ४४, ३९ मधील १२, ४० मधील ६, आणि ४२ मधील ८ रुग्ण आहेत. मात्र, स्मार्ट सिटीच्या नकाशात १२१ रुग्ण कसे काय दाखविण्यात आले, या बद्दल आश्चर्य वाटत आहे. म्हणूनच त्या बाबत आयुक्तांकडेही तक्रार केली आहे.’’ 

आकडेवारीच्या संकलनात काही वेळा त्रुटी राहू शकते. त्यामुळेच पुन्हा- पुन्हा खातरजमा करण्याचा आदेश दिला आहे. आकडे नेमके स्पष्ट झाल्याशिवाय नकाशा प्रसिद्ध केला जाणार नाही. धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाबाबत नेमका प्रकार काय झाला आहे, याची खातरजमा केली जाईल. 
- रुबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटीच्या 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT