पिंपळे गुरव - उभारण्यात येणाऱ्या पीएमपी बसस्थानकाचे संकल्पचित्र. 
पुणे

पिंपरीत ‘स्मार्ट सिटी’ वेगात

पीतांबर लोहार

पिंपरी - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, कासारवाडी व वाकड भागांत काही कामे सुरू आहेत. त्यातील एरिया बेस डेव्हलपमेंटविषयक कामे महत्त्वाची ठरणार आहेत. त्यांना गती देण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत रस्ते, नालेसुधार, क्रीडांगणे, मेट्रो स्टेशन, रेल्वे स्थानक परिसर व बीआरटी स्टेशन आदींबाबतची पायाभूत कामे केली जाणार आहेत. 

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झालेला आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना केलेली आहे. त्याअंतर्गत शहर परिवर्तन कार्यालय सुरू करण्यात आलेले असून, त्यामाध्यमातून शहराचे सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यंत सुमारे १४ हजार नागरिकांचा प्रतिसाद मिळालेला असून, त्यांच्याकडून स्मार्ट सिटीसाठी १४ हजारांवर सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यांच्या अनुषंगाने काही कामे महापालिकेने हाती घेतली आहेत. शहर विकासाचा मसुदा तयार केलेला आहे. त्यासाठी सहा प्रमुख क्षेत्रांची निवड करून २२ धोरणात्मक उपक्रमांची आखणी केलेली आहे.

शहराचे ध्येय, उद्दिष्ट, मूल्ये व धोरणांचा आराखडा तयार केला आहे. त्याबाबतचा तपशील व धोरणात्मक उपक्रम राबविण्याचे नियोजन केलेले आहे. 

महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागांतर्गत स्मार्ट सिटीचे सर्व कामकाज सुरू आहे. हे कामकाज निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी व त्या कामाला गती देण्यासाठी स्मार्ट सिटी सेलची स्थापना करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीसाठी महापालिकेने पॅन सिटी व एरिया बेस डेव्हलपमेंट अशा दोन मार्गांचा अवलंब केलेला आहे. एरिया बेस डेव्हलपमेंटविषयक कामकाज करण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. हे सर्व अधिकारी सध्या महापालिकेच्या स्थापत्य विभागात कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात असून, महापालिकेचे दैनंदिन कामकाज सांभाळून स्मार्ट सिटी सेलकडील एरिया बेस डेव्हलपमेंटविषयक कामे त्यांनी करायची आहेत.

जबाबदारी असलेले अधिकारी
स्मार्ट सिटीअंतर्गत कामकाज करण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, उपअभियंता विजय भोजने, हरविंदरसिंग बन्सल, कनिष्ठ अभियंता सुनील पवार व नरेश जाधव यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या कामकाजाचे नियोजन व वाटप करण्याची जबाबदारी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा स्मार्ट सिटी सेलचे सह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची असेल, असा आदेश महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी काढला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT