पुणे

स्मार्ट मीटर काढा, अन्यथा ठिय्या आंदोलन

CD

वाल्हे, ता. २५ : स्मार्ट मीटर काढा अन्यथा आठ सप्टेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करू, असा इशारा नीरा-शिवतक्रार ग्रामपंचायतीने लेखी पत्राद्वारे महावितरणला दिला आहे. ग्राहकांच्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविल्याचा आरोप करत नागरिकांनी मंगळवारी (ता. २५) महावितरणच्या नीरा कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालत निवेदन दिले.
ग्रामपंचायतीने गावात स्मार्ट मीटर बसवू नयेत याबाबत महावितरणच्या कार्यालयाला लेखी पत्र दिलेले असतानाही ग्राहकांच्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महेश जेधे, टी. के. जगताप, मंगेश ढमाळ यांच्यासह नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता शरद अवताडे यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले. यावेळी सहाय्यक अभियंता आलिम मणियार, पोलिस उपनिरीक्षक रविराज कोकरे, पोलिस हवालदार संतोष मदने यांच्यासह महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांनी वाढीव वीज बिले तसेच विविध कर व शुल्कांबाबतच्या तक्रारी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी सहाय्यक अभियंता आलिम मणियार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे मीटर पुन्हा बसवावेत अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, नागरिकांच्या मागण्या ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत महावितरणला दिली आहे. या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास मंगळवार (ता. ८ सप्टेंबर) पासून नीरा-शिवतक्रार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
याप्रसंगी अकबर सय्यद, सचिन मोरे, सुधीर शहा, अमोल साबळे, संतोष मोहिते, चंद्रशेखर पवार, अरविंद जेधे, शुभम ढावरे आदींसह नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehkar Hospital Negligence : मेहकरमध्ये रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर रस्त्यावर प्रसूती; आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत नाकारल्याने संताप

IND vs SL: 'तू वेळ वाया घाववतोय ब्रो...', सर्फराज खानची श्रीलंकन कर्णधाराला स्लेजिंग, Video होतोय Viral

Tribal Students Protest : चर्चा फिस्कटल्याने आदिवासी विद्यार्थ्यांकडून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा; नव्याने दोन अत्यवस्थ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

Marathi News Live Updates : तरुण तेजपाल यांना तीन आठवड्यांच्या आत शरणागती पत्करण्याचे आणि शरणागतीचे प्रमाणपत्र न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश

Jalkot Water Supply : जळकोटचा पाणीप्रश्न सुटणार; ६२ कोटींच्या नवीन जलवाहिनी व नळयोजनेला नगरपंचायतीची मंजुरी

SCROLL FOR NEXT