पुणे

औंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात

सकाळवृत्तसेवा

पुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते या पद्धतीने विकसित होणार आहेत. 

औंधमध्ये डीपी रस्त्यावर दोन-अडीच मीटरचे पदपथ होते. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले होते. या पार्श्‍वभूमीवर स्मार्ट सिटी कंपनीने हा रस्ता मॉडेल रस्ता तयार करण्याचे ठरविले. त्यानुसार मार्च २०१७ मध्ये त्याचे काम सुरू झाले. पदपथांची रुंदी वाढवून ४ ते ६ मीटर केली. या रस्त्यावरील वृक्षसंपदाही कायम ठेवली. अपंगांनाही हा पदपथ सहज वापरता येईल, अशी त्याची रचना केली आहे. त्यामुळे व्हीलचेअरचा वापर करणारे नागरिकही या पदपथाचा वापर करू लागले आहेत. पुढच्या टप्प्यात स्मार्ट बस स्टॉप आणि स्मार्ट टॉयलेट उभारणार आहे. त्याचा आराखडा निश्‍चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आर्किटेक्‍ट व अर्बन डिझायनर प्रसन्न देसाई यांनी या रस्त्याचा आराखडा तयार केला आहे. या रस्त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने १८ कोटी रुपये खर्च केले आहेत. 

या शहरांत  स्मार्ट स्ट्रीट
औंधमधील मॉडेल रस्त्याचे अनुकरण देशातील कोइमतूर, वाराणसी, धरमशाला, चेन्नई, काकीनाडा, अजमेर, उदयपूर, रायपूर, नाशिक, औरंगाबाद आणि पिंपरी-चिंचवडमध्ये झाले आहे. तेथील अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून आराखड्यानुसार त्यांच्या-त्यांच्या शहरात असा पदपथ तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarapur News : डहाणू लव्ह जिहाद अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; न्यायालयीन प्रक्रिया सुरू

BAN vs AUS 1st ODI: बांगलादेशच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन कर्णधार जॉश इंग्लिससोबत 'राडा' घातला; मॅच जिंकून मालिकेत घेतली आघाडी

Collagen for Skin & Joint Health: कोलेजन खरोखरच त्वचा सुधारण्यास आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करते का?

Meenakshi Natarajan Nomination Rejected : काँग्रेसला मोठा धक्का! राज्यसभेच्या एकमेव उमेदवाराचा अर्ज रद्द; भाजपच्या तक्रारीनंतर ऐनवेळी नेमकं काय घडलं?

IND A vs SL A : ऋतुराज गायकवाडचे 'रौद्र रूप' पाहून सारेच चक्रावले; वादग्रस्त निकालावर भडकला, अम्पायरला भिडला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT