पुणे

दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी ए. जी. पाटीलच्या विद्यार्थिनींची ‘स्मार्ट व्हीलचेअर’

CD

PNE26W29718
सोलापूर ः ‘स्मार्ट व्हीलचेअर’ प्रकल्प सादर करताना विद्यार्थिनींसमवेत प्रकल्प मार्गदर्शक प्रा. एस. एस. मेटगार व प्राध्यापकवृंद.

‘ए. जी. पाटील’च्या विद्यार्थिनींची
दिव्यांगांसाठी ‘स्मार्ट व्हीलचेअर’

सोलापूर, ता. २५ : ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थिनींनी दिव्यांग व ज्येष्ठ व्यक्तींसाठी उपयुक्त ठरणारी ''स्मार्ट व्हिलचेअर युसिंग जॉयस्टीक'' ही नाविन्यपूर्ण स्मार्ट व्हीलचेअर विकसित केली आहे. या प्रकल्पामुळे शारीरिकदृष्ट्या अक्षम व्यक्तींना अधिक सुरक्षित व स्वावलंबीपणे हालचाल करणे शक्य होणार आहे. अमृता पाटील, प्रेरणा जगताप आणि पूनम दुम्मनवार यांनी प्रा.एस.एस.मेटगार यांच्या मार्गदर्शनाखाली हा समाजोपयोगी प्रकल्प साकारला.
स्मार्ट व्हीलचेअरमध्ये जॉयस्टिक कंट्रोलर, मायक्रो-कंट्रोलर आधारित नियंत्रण प्रणाली, मोटर ड्रायव्हर सर्किट, डीसी मोटर्स आणि रिचार्जेबल बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. जॉयस्टिकच्या साहाय्याने व्हीलचेअर पुढे, मागे तसेच डावीकडे-उजवीकडे सहजपणे नियंत्रित करता येते. प्रकल्प समन्वयक प्रा. आर. बी. बिराजदार यांचे मार्गदर्शन, तसेच विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. दरेकर यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष एस. ए. पाटील, सचिव एस. एस. पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार आणि कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले यांचेही सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale on Gyanesh Kumar : 'ज्ञानेश कुमार काहीही झाले तरी राजीनामा देणार नाहीत'; अभिजीत दीपकेंच्या आंदोलनावर रामदास आठवले स्पष्टच बोलले, दिला कडक इशारा

Pune News : खेळाच्या मैदानावरील अनधिकृत इमारत महापालिकेच्या बांधकाम विभागाने केली जमीनदोस्त

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी ४८ उमेदवार रिंगणात; ९ ऑक्टोबरला माघारीची अंतिम मुदत

Uruli Kanchan News : पोलिसांच्या कर्तव्य भावनेने मजूर दांपत्याला मिळाला आधार! खाकी वर्दीतील माणुसकी आली धावून

Ishan Kishanने मोडला विराट कोहलीचा १० वर्षे जुना विक्रम; भारतीय खेळाडूंच्या 'या' लिस्टमध्ये अव्वल

SCROLL FOR NEXT