पुणे

अकोलेत वर्षभरात सर्पदंशाच्या २०० घटना विषारी सापांसाठी ‘रेस्क्यू सेंटर’ची आवश्यकता; वाढत्या सर्पदंशाच्या घटनांनी चिंता

CD

सापाचा फोटो टाकावा.
---------
अकोलेत सर्पदंशाचा आकडा वाढतोय
नाग-घोणस-मण्यार-फुरशाचा धोका; सर्पदंश रोखण्यासाठी प्रशिक्षणाची मागणी
अकोले, ता. ६ : विंचवाच्या दहशतीसोबतच अकोले तालुक्यात विषारी सापांचा धोका वाढला आहे. वर्षभरापेक्षा कमी कालावधीत २०० हून अधिक सर्पदंशाच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. काही घटनांमध्ये एकाच वेळी दहा ते बारा रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. गेल्या काही महिन्यांत सर्पदंशामुळे तिघांचा मृत्यू झालेले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात विषारी सापांसाठी स्वतंत्र ‘रेस्क्यू सेंटर’ सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अकोले तालुक्यात नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे हे विषारी साप आढळतात. जंगलक्षेत्रातील बदल, डोंगरफोड, ओढे-नाल्यांवरील अतिक्रमण आणि जंगलतोड यामुळे सापांचा नैसर्गिक अधिवास कमी होत आहे. त्यामुळे साप मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्पदंशाच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.
सर्पदंशाच्या वाढत्या घटनांची गंभीरता लक्षात घेऊन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी काही दिवसांपूर्वी अकोले शहरातील दोन रुग्णालयांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी दोन रुग्णालयांत अनुक्रमे १११ आणि ५०, असे एकूण १६२ सर्पदंशाचे रुग्ण यावर्षी उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती मिळाली. संगमनेर, नाशिक तसेच अन्य ठिकाणी उपचारासाठी गेलेल्या रुग्णांचा विचार केल्यास ही संख्या २०० पेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
शेतात काम करताना, गुरे चारताना, चारा काढताना तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडल्यावर सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. डॉ. एम. के. भांडकोळी यांच्या रुग्णालयात मागील वर्षी सुमारे ७० सर्पदंशाचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र, यंदा ऑगस्टअखेरपर्यंतच १५५ रुग्ण दाखल झाल्याने सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.
सापांबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे. सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला वेळेत आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने गावपातळीवर प्राथमिक उपचाराबाबत प्रशिक्षण देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. साप चावल्यानंतर मांत्रिक किंवा पारंपरिक उपचारांकडे न जाता तातडीने रुग्णालयात दाखल करण्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.
तालुक्यात सर्पदंशाच्या घटनांची वाढती संख्या आणि त्यातून होणारे मृत्यू लक्षात घेता, सर्पमित्रांचे प्रशिक्षण, जनजागृती आणि स्वतंत्र रेस्क्यू सेंटरची सुविधा उभारण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
----------------------
सापांच्या बाबतीत असणारे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती गरजेची आहे. सर्पदंश झाल्यास करावयाच्या प्रभावी प्राथमिक उपचारांसाठी गावपातळीवर प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. सापांचे खासगी रेस्क्यू सेंटर सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी.
-सचिन गिरी, सर्पतज्ज्ञ, संगमनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधी, प्रियंका गांधींना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT