Snake Found in Zilla Parishad Primary School esakal
पुणे

ZP School : जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नाग फणा काढून उभा राहिला अन् शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी..; काय केलं पाहा?

पावसाळा सुरु झाल्यामुळे मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढले आहे.

डी. के वळसे पाटील

मंचर : शिंदेवाडी-एकलहरे (ता. आंबेगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (Zilla Parishad Primary School) पक्षांचा चिवचिवाट ऐकून मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे वर्गाच्या बाहेर आले. चक्क फणा काढून उभा राहिलेला नाग (Snake) पाहून त्यांच्यासह अन्य शिक्षकांची व विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी प्रसंगावधान राखून ताबडतोब सर्पमित्र धर्मेंद्र भालेराव यांना बोलावले. त्यानंतर नागाला पकडून बाटलीमध्ये ठेवण्यात यश आले.

त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी सुटकेचा विश्वास सोडला. घोड नदीच्या जवळच शिंदेवाडी-एकलहरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. बुधवारी (ता. १०) कानडे विद्यार्थ्यांना शिकवत होते. अचानकपणे पक्षांचा चिवचिवटाचा आवाज आल्याने त्यांचे लक्ष बाहेर गेले. त्यावेळी त्यांना सहा फूट उंचीचा नाग शाळेच्या आवाराच्या दिशेने येताना दिसला. त्यांनी सर्पमित्राला फोन केल्यानंतर भालेराव यांनी शिताफीने नाग पकडला. कानडे यांच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

“पावसाळा सुरु झाल्यामुळे मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सर्पदंश होण्याची भीती असते. चापडा, फुरसे, नाग, मानियार, कोब्रा, घोणस यासारखे साप मानवासाठी जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांनी सापापासून वाचण्यासाठी सतर्क राहावे.”

-धर्मेंद्र भालेराव, सर्पमित्र

“सर्पमित्रांना शासनाने मानधन देणे गरजेचे आहे. ते स्वतःच्या जीवावर उदार होऊन नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सर्प पकडत असतात. मध्यंतरी कितीतरी सर्पमित्रांना नागाने दंश केल्याने आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. तरीसुद्धा काही सर्पमित्र अजूनही हे काम विना मोबदला करताना परिसरामध्ये दिसून येतात. नागरिकांनी सुद्धा घरामध्ये किंवा अन्य कुठेही सर्प पकडल्यानंतर स्वखुशीने सर्पमित्रांना बक्षीस देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा करणे गरजेचे आहे.”

-बाळासाहेब कानडे, मुख्याध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT