पुणे

एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी २

CD

म्हाळुंगे-बालेवाडी ः श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत हॉकी मैदानावर सुरू असलेल्या एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत जय गणेश अकादमी आणि आंध्र प्रदेशच्या सम्राट हॉकी संघ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक चुरशीचा क्षण.
--------------
घुमनहेरा अकादमीचा ग्रासरुट संघावर विजय
एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी ः जय गणेश अकादमी उपांत्यपूर्व फेरीत
पुणे, ता. २ ः एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आयोजित सोळा वर्षांखालील गटाच्या दहाव्या एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत घुमनहेरा अकादमीने ग्रासरुट संघावर २३-० असा विजय मिळविला, तर जय गणेश अकादमीने दुसऱ्या विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या स्पर्धेत पाच सामन्यांतून तब्बल ४९ गोल नोंदविले गेले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत हॉकी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत घुमनहेरा अकादमीकडून हितेश कटारिया (५, २२, २५, ४५ वे मिनीट) व लक्ष्मण कुमारने (१५, २४, २६, ६० वे मिनीट) प्रत्येकी चार गोल केले. त्यांना कार्तिक बारवार, जय फासवालने प्रत्येकी तीन, आर्यन खान, देव फालसवाल आणि राहुल नैनने प्रत्येकी दोन, तर मयंक फालसवाल, अंश कुमार व सिद्धार्थ पी.ने प्रत्येकी एक गोल करून सुरेख साथ दिली.
जय गणेश अकादमीने आंध्र प्रदेशच्या सम्राट हॉकी संघाचा ८-० असा पराभव करून सलग दुसऱ्या विजय मिळविला. यावेळी फारझानने तीन, तर रिशिकेश, देवेंद्र, अभिषेक पाल, अब्दुल गनीने गोल केले. उपांत्यपूर्व फेरी गाठणारा तो पहिलाच संघ ठरला आहे.
एसएआयएल हॉकी अकादमीने जोरदार खेळ करताना वीर हॉकी अकादमीवर १०-० अशा गोलने विजय प्राप्त केला. त्यात महत्त्वाचा वाटा मोहम्मद शाहिदने (३, ९, २८, ५० वे मिनीट) केलेल्या चार गोलांचा होता. त्याला कुणाल आणि सुमनने प्रत्येकी दोन तर दीपक व सुजलने प्रत्येकी एक गोल करून सुरेख साथ दिली.
यश अकादमीने हॉकी नाशिक संघाचा ५-० अशा गोलने पराभव केला. यावेळी रोहितने तीन तर राहुलने दोन गोल केले.
अखेरच्या लढतीत रिपब्लिकन स्पोर्ट्‌स क्लबने एनडीएमसी हॉकी संघाचा रंगतदार सामन्यात २-१ अशा गोलने पराभव केला. यावेळी फोआद शेखने आठव्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. तर हनीने ५२व्या मिनिटाला बरोबरी साधली; मात्र पार्थ चिंतलने ५७व्या मिनिटाला निर्णायक गोल करत रिपब्लिकन स्पोर्ट्‌स क्लबला विजय मिळवून दिला.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

वीर पहाडियाचा रोमँटिक अंदाज, आफिया सय्यदचं पदार्पण; ‘प्रेम कीटाणू’ ठरतोय तरुणाईचा सिनेमा?

SCROLL FOR NEXT