पुणे

आयफोन १८ प्रश्नमंजूषेत स्नेहल देवधर विजयी ‘सकाळ’ने आयोजित स्पर्धेला उदंड प्रतिसाद

CD

पुणे, ता. ५ ः ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘आयफोन १८ प्रश्नमंजूषा’ उपक्रमाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, या प्रश्नमंजूषेत पुण्यातील स्नेहल देवधर विजेत्या ठरल्या आहेत. आयफोन १८ संदर्भातील विविध प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याबद्दल त्यांना २५६ जीबी क्षमतेचा ‘आयफोन १७’ बक्षीस म्हणून मिळाला आहे.
‘आयफोन १८ प्रो’मधील चिपसेट, डिस्प्ले तंत्रज्ञान, फ्रेमसाठी वापरण्यात आलेले साहित्य, कॅमेऱ्याची मेगापिक्सेल क्षमता आणि आयफोन १८ प्रो मालिकेतील नवीन रंग यासंदर्भात प्रश्नमंजूषेत पाच प्रश्न विचारण्यात आले होते. अचूक उत्तरे देणाऱ्या वाचकांमधून लकी ड्रॉद्वारे विजेत्याची निवड करण्यात आली. त्यानुसार देवधर यांची विजेत्या म्हणून निवड झाली. या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादातून वाचकांचा तंत्रज्ञान आणि नव्या स्मार्टफोनविषयीचा उत्साह दिसून आला. प्रश्नमंजूषेत सहभागी होण्यासाठी वाचकांनी क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन उत्तरे नोंदविली होती. अचूक उत्तरे देणाऱ्या वाचकांतून विजेत्या ठरलेल्या देवधर या वेळी म्हणाल्या,‘‘‘सकाळ’च्या या उपक्रमात सहभागी होणे हा आनंदाचा अनुभव होता. मोठ्या प्रतिसादातून आपली विजेती म्हणून निवड होणे विशेष आनंददायी आहे. आयफोन १७ जिंकण्याचा हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या उपक्रमात वाचकांना सहभागी करून घेतल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार.’’
----------
फोटो ः 55236

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT