पुणे

अहिल्यानगर

CD

PNE26W19149
सोमनाथ सपकाळ

महाराष्ट्र बेसबॉलच्या प्रशिक्षकपदी
सोमनाथ सपकाळ यांची निवड
अहिल्यानगर, ता. १४ ः जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना घडवणारे आणि मैदानावर मेहनत, शिस्त व जिद्दीचे संस्कार रुजवणारे क्रीडा मार्गदर्शक सोमनाथ सपकाळ यांची भुवनेश्‍वर (ओडिशा) येथे आयोजित ३१ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य मुले संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
वर्षानुवर्षे ग्रामीण भागातील मुलांना मैदानाशी जोडत, त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करत आणि राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी प्रेरित करणाऱ्या सपकाळ यांच्या कार्याचा हा मोठा गौरव मानला जात आहे. त्यांच्या या निवडीकडे केवळ पदाची जबाबदारी म्हणून नव्हे, तर एका समर्पित प्रशिक्षकाच्या कष्टांचा सन्मान म्हणून पाहिले जात आहे. भुवनेश्‍वर येथे २४ ते २९ दरम्यान रंगणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी महाराष्ट्र संघाचे सराव व निवड प्रशिक्षण शिबिर बारामती येथे १४ ते २१ दरम्यान आयोजित केले.
त्यांच्या निवडीचे वृत्त समजताच जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष अरुण चंद्रे, सचिव मकरंद कोराडकर, प्रा. कल्पेश भागवत, अहिल्यानगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव शैलेश गवळी आणि कार्याध्यक्ष संजय साठे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke: मुलाने दिला लढा, सरकार झुकलं; आईच्या एका वाक्याने अनेकांचे डोळे पाणावले... दिपकेंच्या गावात जल्लोष! Video Viral

Anna Hazare Reaction : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया, सरकारला दिला 'हा' सल्ला

सुनीताला गोविंदा आणि करिष्माच्या अफेअरबद्दल माहीत होतं... अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; ती गप्प राहिली कारण...

Latest Marathi News Update : अंधभक्ताविरोधात देशभक्त जिंकले, मोदीजी आतातरी देशाकडं लक्ष द्या : उद्धव ठाकरे

Chandoli Dam News: चांदोली धरण ७८% भरले; वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली, परिसरात मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT