Sobati Sanitary Napkin 
पुणे

‘सोबती’चा लाखाचा टप्पा पार

ज्ञानेश्वर रायते

बारामती - जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातून व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सहकार्यातून तयार झालेल्या ‘सोबती’ नॅपकिन सहा महिन्यातच ४५ हजार महाविद्यालयीन युवतींप्रमाणेच ५५ हजार महिलांपर्यंत पोचली आहे. दोन दिवसांपूर्वी हा लाखाचा टप्पा गाठलेल्या ‘सोबती’ सॅनिटरी नॅपकिनमुळे ग्रामीण भागात मासिक पाळी व स्वच्छतेची नवी चळवळ यशस्वी झाली आहे. ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदा पवार यांनी आज ही माहिती दिली. 

त्या गेल्या तीन महिन्यांपासून महाविद्यालयीन युवतींना मासिक पाळी व स्वच्छतेविषयी महाविद्यालये, शाळांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहेत. रोहित पवार यांनी जिल्हा परिषद सदस्य बनल्यानंतर आरोग्याचा प्रश्‍न सर्वप्रथम हाती घेतला, तेव्हा महिलांच्या आरोग्यामध्ये मासिक पाळी व स्वच्छतेचा अभाव असल्याची माहिती मिळाली. शाळांमध्ये मुली या काळात जात नाहीत याचीही माहिती मिळाल्याने त्यांनी सॅनिटरी नॅपकिनच्या वापराची मोहीम हाती घेतली. मात्र यामध्ये संवादाचा व कृतीचा पूल उभारण्यासाठी त्यांनी ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदा पवार यांची मदत घेतली. 

अर्थात, बाजारातील सॅनिटरी नॅपकिनच्या वाढीव किमती व पर्यावरणानुकूलतेचा अभाव ही दोन कारणे त्यांनी शोधून ‘सोबती’ नावाने ट्रस्टमध्येच सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. 
यामध्ये प्लॅस्टिक वापरले जाणार नाही, याची दक्षता घेतली.

‘बायोडिस्पोजल’ असलेला त्यासाठी महिला बचत गटांना हाताला काम दिले. चार तालुक्‍यांतील महिला गटांना सॅनिटरी नॅपकिन तयार करण्याच्या मशिन पुरवल्या. याखेरीज आशा स्वयंसेविकांमार्फत वाड्यावस्त्यांपर्यंत नॅपकिन पुरवण्याची मोहीम आखली आणि अल्प खर्च आणि गुणवत्तेच्या जोरावर आज सहा महिन्यांच्या कालावधीत ग्रामीण भागातील महिलांसाठी ‘सोबती’ हा आरोग्याचा आधार बनला.

आता शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार
सुनंदा पवार या गेली काही महिने प्रत्येक शाळांमध्ये जात आहेत. मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन देऊन त्यांच्यामध्ये वापराची जनजागृती करीत आहेत. यापुढील काळात पुणे जिल्हा व शहरातही त्या जनजागृती करणार आहेत. मात्र, त्यापुढील काळात जिथे आधी शाळांमध्ये संवाद साधला, तिथे प्रत्येकवेळी जाता येणार नाही. अशावेळी शाळांमधील शिक्षकांनी ही जागल्याची भूमिका पार पाडावी. यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत. आता ट्रस्ट आणि प्रवीण निकम यांची रोशनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यासंदर्भात शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw : ११ चौकार, १ षटकार! पृथ्वीच्या आक्रमक खेळीमुळे वैभव सुर्यवंशीचे विश्वविक्रमी शतक व्यर्थ; महाराष्ट्राचा बिहारवर विजय

मुंबई- पुणे नाही तर 'या' ठिकाणी सुरू आहे सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीचा विवाहसोहळा; पाहुणे कोण कोण आले पाहिलंत का?

Mumbai Crime: आधी मिठी, गाल ओढून चावण्याचा प्रयत्न, नंतर गुप्तांगाला...; ६० वर्षीय नराधमाचे चिमुकल्यासोबत नको ते कृत्य; मुंबईत खळबळ

Latest Marathi News Live Update : परभणीच्या जिंतूर नगरपरिषद मतदानादरम्यान तणाव

माेठी बातमी ! 'शासकीय कर्मचारी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी बहीण'चा लाभ'; शासनाच्या आदेशाला केराची टाेपली !

SCROLL FOR NEXT