पुणे

गावातील सरकारी शाळांचे ''सोशल ऑडिट'' ; 15 ऑगस्ट पासून देशव्यापी मोहीम

CD

शाळांचे ‘सोशल ऑडिट’;
१५ ऑगस्टपासून मोहीम
दीपके यांचा उपक्रम; वीज, पाणी, शौचालय व मध्यान्ह भोजनाची तपासणी
छत्रपती संभाजीनगर, ता. १२ : ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधांची दुरवस्था समोर आणण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांच्या पुढाकाराने १५ ऑगस्टपासून देशव्यापी ‘सोशल ऑडिट’ (सामाजिक परीक्षण) मोहीम सुरू होणार आहे. या मोहिमेत पालक, नागरिक आणि ग्रामपातळीवरील नेतृत्वाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही ग्रामीण भागातील अनेक सरकारी शाळांमध्ये वीज, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि दर्जेदार मध्यान्ह भोजनासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा दावा सीजेपीने केला आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांतील विद्यार्थी आणि विशेषतः मुलींना बसत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. या मोहिमेची सुरवात हिंगोली गावातून करण्यात येणार असून, दीपके स्वतः सरपंचांची भेट घेऊन सरकारी शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करणार आहेत. शाळांची स्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सरपंचांचे कौतुक करण्यासाठी शाळांच्या सुधारणेपूर्वीचे आणि नंतरचे छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. ‘अस्सल भारत गावांमध्ये राहतो. आपण एकत्र आलो आणि संघटितपणे प्रयत्न केले, तर प्रत्येक सरकारी शाळा मुलांच्या भविष्यासाठी उत्तम ठिकाण बनवू शकतो,’ असे अभिजित दीपके यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक-रायगडमध्ये कोण करणार ध्वजारोहण? मंत्र्यांची यादी जाहीर; पाहा तुमच्या जिल्ह्यात कोण?

Organ Donate : दुःखातही अवयवदानाचा निर्णय! मुळेकर कुटुंबीयांच्या त्‍यागाने चौघांना जीवदान

जखमी हत्तींच्या मदतीला धावली 'एलिफंट ब्रिगेड'; पलामूमध्ये ४ पाळीव हत्तींचे अनोखे पथक

Tukaram Mundhe: आता कारवाई थांबणार नाही! तुकाराम मुंढेची ताकद अजून वाढणार; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

पुण्यातल्या कर्वेनगर पुलाखाली चालत्या गाडीने घेतला पेट, घटनेचा Video समोर...

SCROLL FOR NEXT