alandi  
पुणे

आळंदीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा...

सकाळवृत्तसेवा

आळंदी ः आळंदी (ता. खेड) येथील संपूर्ण व्यवहार दोन दिवस बंदमुळे ठप्प होते. मात्र, बुधवारी सकाळपासून पुन्हा दुकानांना परवानगी दिल्याने शहरातील विविध रस्त्यांवर भाजीची जागोजागी दुकाने लागली आणि लॉकडाउनचा पूर्ण फज्जा उडाला. आळंदीच्या उंबरठ्यावर कोरोनाचा संसर्ग येऊन ठेपला आहे. मात्र, पालिका प्रशासन अद्याप सोशल डिस्टन्सच्या बाबतीत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले. 

सोमवारी आणि मंगळवारी आळंदीत भाजी आणि व्यापाऱ्यांची दुकाने बंद केली होती. पोलिसांचा बंदोबस्त असल्याने या दोन दिवसांत गाड्यांची वर्दळ पूर्ण थांबली. मात्र, आज सकाळपासून पुन्हा किराणाची दुकाने उघडली. तर शहरातील विविध रस्त्यांवर भाजी आणि फळ विक्रेत्यांचा सुळसुळाट दिसून आला.

पालिकेने परवानगी फक्त ४० लोकांना दिली. मात्र, दुपटीपेक्षा अधिक विक्रेते आज रस्त्यावर पथारी मांडून भाजी विकत होते. ग्राहक आणि भाजीच्या दुकानांमध्ये कोणतेही सोशल डीस्टन्सचे पालन केले जात नव्हते. दुचाकी वाहनांचा खच रस्त्यावर होता.

नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी पालिका प्रशानाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून प्रांताधिकारी संजय तेली यांच्याकडे प्रशासनाच्या गलथान कारभाराची तक्रार केली. वास्तविक आळंदीलगत चऱ्होली आणि दिघी गावात कोरोनाचा रुग्ण आढळला. त्या गावांच्या सिमा पूर्ण बंद केल्या. मात्र, आळंदीत भाजी विक्रेत्यांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोनाची भीती वाढू लागली आहे. 

सोशल डिस्टन्सचा भंग होऊ नये यासाठी चऱ्होली रस्त्यावरील शाळेचे मैदान, वडगाव रस्त्यावरील आणि झाडी बाजारातील पार्किंग आणि नवीन एसटी स्थानकाच्या मोकळ्या पटांगणात विक्रेत्यांना बसवून भाजी मंडई केली तर त्या भागातील नागरिक भाजीसाठी दूरवर फिरणार नाहीत. रस्त्यावरील मोकाट गर्दी कमी होईल. याबाबत विचार व्हावा यासाठी प्रांताधिकारी संजय तेली यांच्याकडे मागणी केली आहे. 
- वैजयंता उमरगेकर, नगराध्यक्ष 

पालिकेचे पथक विक्रेत्यांवर कारवाई करत आहे. सकाळी अकराच्या दरम्यान विक्रेत्यांचे वजनकाटे जप्त केले. 
- समीर भूमकर, मुख्याधिकारी, आळंदी पालिका 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT