ranjangaon 
पुणे

रांजणगावात सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

सकाळवृत्तसेवा

तळेगाव ढमढेरे : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आज सकाळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती, मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे काही काळानंतर सोशल डिस्टन्स पाळून गर्दीवर नियंत्रण आणण्यात प्रशासनाला यश आले. 
येथील जिल्हा परिषद शाळेत शासनाच्या योजनेसाठी नावनोंदणी सुरु असून, आज सकाळी लाभार्थीनी प्रचंड गर्दी केली होती. 

पुणे- नगर रस्त्यावर लांबच्या लांब दोन रांगा नागरिकांनी लावल्या होत्या. कोरोनाला रोखण्यासाठी येथील प्रशासनाने आत्ता पर्यंत संचारबंदी व लॉकडाउन यशस्वी केले आहे, परंतु परराज्यातील कामगारांना शासनाने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असल्याने परिसरातील विविध गावातील नागरिकांनी व कामगारांनी प्रचंड गर्दी केली. 

रांजणगावच्या स्थानिक ग्रामस्थांनी संचारबंदी व लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी केली. त्यामुळे येथील प्रशासनाला कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आत्तापर्यंत यश आले आहे. 

अष्टविनायक महागणपतीचे तीर्थक्षेत्र असलेले रांजणगाव आजपर्यंत तरी कोरोनामुक्त आहे. परंतु एकीकडे लॉकडाउन व संचारबंदी आणि दुसरीकडे शासनाच्या योजनेसाठी लाभार्थींनी सोशल डिस्टन्स न पाळता केलेली गर्दी यामुळे नियम पाळणारे ग्रामस्थ पुरते त्रस्त झाले आहेत. 

लाभार्थी नागरिकांच्या गर्दीमुळे रांजणगावात सोशल डिस्टन्स व संचारबंदीचा फज्जा उडाल्याचे दृश्य आज तरी येथे पाहायला मिळाले. 

नागरिकांनी संचारबंदी व लॉकडाउन पाळून घरातच बसावे व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

Latur News: युद्धामुळे आता बांधकामेही ‘गॅस’वर; सिलिंडरअभावी टाइल्सची निर्मिती ठप्प, लोखंडही महागले

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अशोक खरातचा पीए रमेश हिंगे फरार, SIT कडून शोधमोहीम सुरू

Prashant Raut Memorial: तुझ्यामुळे ‘सरणा’साठी जागा मिळाली, स्मारकासाठी आम्ही अपयशी; दोन दशकापासून ‘शहीद प्रशांत राऊत’ स्मारकासाठी उदासीनता!

SCROLL FOR NEXT