social leader baba adhav 
पुणे

शेतकरी, कामगारांना न्याय मिळेना : डॉ. आढाव

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड - सरकारच्या धोरणामुळे सध्या गरीब गरीबच तर श्रीमंत अधिकच श्रीमंत होत चाललेले आहेत. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. समाजात अराजकता माजली आहे. शेतकरी, कामगार यांनाही या सरकारच्या काळात न्याय मिळत नसल्याची टीका ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी केली. 

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यालयावर कामगार संघटनांनी डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांना निवेदन देण्यात आले.

बाजार समितीतील श्री. छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियन, हमाल पंचायत, महात्मा फुले कामगार संघटना, मार्केटयार्ड टेम्पो संघटना, महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन या सर्व संघटना शेतकऱ्यांना पाठिंबा देत मोर्चामध्ये सहभागी  झाल्या होत्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, तोलणार संघटनेचे हनुमंत बहिरट, राजेंद्र चोरघे, कामगार युनियनचे संतोष नांगरे, हमाल पंचायतीचे गोरख मेंगडे, पथारी संघटनेचे बाळासाहेब मोरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT