Social Media esakal
पुणे

Social Media : नेटकऱ्यांनी घेतली वेधशाळेची ‘शाळा’

मुंबईसह राज्यात सोमवारी झालेल्या तुफान पावसानंतर हवामान खात्याने मंगळवारीही ऑरेंज अलर्ट दिला होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मुंबईसह राज्यात सोमवारी झालेल्या तुफान पावसानंतर हवामान खात्याने मंगळवारीही ऑरेंज अलर्ट दिला होता. पावसाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, पावसाऐवजी आज ऊन पडल्याने नेटकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.

समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल झाल्याचे दिसून येत होते. एकूणच हवामान खात्याचा अंदाज चुकल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र वेधशाळेचीच शाळा घेतल्याचे दिसून येत होते.

हवामान खात्याच्या अंदाजाबाबत अनेकदा समाजमाध्यमांवर नेटकरी व्यक्त होत असतात. असाच काहीसा प्रकार मंगळवारी दिसून आला. सोमवारच्या पावसानंतर मंगळवारीही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी सकाळपासून चक्क ऊन पडल्याने हवामान खात्याच्या इशाऱ्यावर नेटकरी मोठ्या प्रमाणावर व्यक्त झाले होते.

ऊन पडल्यानंतर मीम्सचा ‘पाऊस’

व्हायरल झालेले मीम्स...

‘आमच्याकडे आज असं आहे :

आई : का रे शाळेत जायचं नाही का?

मुलगा : मुसळधार पाऊस येणार म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी दिली आहे.

आई : बरं, मग बाहेर उन्हात खेळू नकोस...

  • एकाने तर ऊन पडल्याच्या फोटोसह ‘भयंकर पावसात अडकलोय मित्रांनो,’ अशी पोस्ट शेअर केली आहे.

  • ‘आज सुट्टीच आहे, तर मुलांना ‘हवामान खात्याचे महत्त्व’ यावर निबंध लिहायला सांगा. मुले सुरुवात याने करतील : हवामान खाते हे मुलांचा चांगला मित्र आहे. त्यांच्यामुळे पाऊस थांबतो. त्यांनी दिलेल्या अंदाजामुळे जिल्हाधिकारी काका आम्हाला सुट्टी देतात. त्यामुळे आमच्या घरच्यांची झोपपण पूर्ण होते.’

  • ‘रेड अलर्ट, पुण्यात शाळांना सुट्टी. पाऊस थांबविण्यात हवामान खात्याला यश’

  • ऑरेंज अलर्ट म्हणजे कडक ऊन

  • ‘मुसळधार ऊन पाडण्यात हवामान खाते यशस्वी, पण एका दिवसाची सुट्टी मिळाल्याने विद्यार्थी हवामान खात्यावर खुश’

  • वेधशाळेचीच ‘शाळा’ घेण्याची गरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT