tula pahate re 
पुणे

'तुला पाहते रे' ही मालिका महाराष्ट्रासाठी घातक

सकाळवृत्तसेवा

पुणे: एका खासगी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका महाराष्ट्रासाठी घातक असून, ही माहिती बंद करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून केली आहे.

‘तुला पाहते रे’  या मालिकेत 20 वर्षांची मुलगी 40 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचे दाखवले आहे. मात्र हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्रासाठी घातक आहे. या मालिकेतून आमच्या माता-भगिनींना वेगळा संदेश देण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत आम्ही संबंधित वाहिनीकडे फोनवरुन तक्रार दिली, मात्र ई- मेल करण्यास बजावून आम्हाला धुडकावून लावले. या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला धक्का पोहोचवला जात आहे. या मालिकेतील दिग्दर्शक, निर्माते किंवा अभिनेते आपल्या घरातील 20 वर्षीय मुलीचे लग्न 40 वर्षीय युवकाशी लावून देतील का? त्यामुळे या मालिकेत बदल करावा अन्यथा बंद करावी, असे प्रदीप नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे.

विक्रांत सरंजामे व ईशा निमकर यांची प्रेम कहाणी या मालिकेत दाखविण्यात आली असून, प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सध्या विक्रांत आणि ईशाच्या प्रेम कहाणीत अनेक चढउतार येत आहेत. विक्रांतचा शत्रू जालिंदर याच्या एण्ट्रीमुळे मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. हा जालिंदर विक्रांतविरोधात ईशाला भडकावण्याचाही प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेत पुढे काय घडणार, हे जाणून घेण्याची फार उत्सुकता लागून राहिली आहे. तर दुसरीकडे ही मालिका महाराष्ट्रासाठी घातक असल्यामुळे बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT