पुणे

#SocialDiwali हा दिवा उजेडाबरोबर आनंदही देतो

जितेंद्र मैड

पौड रस्ता - दीपोत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात उजेड पसरवितो. त्याप्रमाणे ज्यांनी कधी दिवाच पाहिला नाही अशांच्या जीवनातील अंधकार दिव्यामुळेच हळूहळू दूर होत आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कल्पना खरात आणि सारिका पाटील. या दोघी दिव्यांग असून त्यांनी आकर्षक दिवे, आकाश कंदील, मेणबत्त्या, पणत्या, जेली कॅंडल, ज्यूट बॅग, भेट कार्ड अशा विविध वस्तू स्वतःच्या हातांनी बनविल्या आहेत. 

कोथरूडच्या गांधी भवनजवळ असलेल्या दि पूना स्कूल अँड होम फॉर दि ब्लाइंड गर्ल्स ट्रेनिंग सेंटर येथे कल्पना आणि सारिका या व्यवसाय शिक्षण घेत आहेत. यामध्ये शिकणाऱ्या २५ मुली आणि काही माजी विद्यार्थिनींनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन कोथरूड अंधशाळेच्या आवारात शुक्रवारपासून (ता. २६) रविवारपर्यंत (ता. २८) सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत भरविले आहे. याबाबत मुख्याध्यापिका वर्षा रांका म्हणाल्या, ‘‘दिव्यांग विद्यार्थिनींना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याचे काम आम्ही १९७९ पासून करत आहोत. यासाठी घेतलेल्या कार्यशाळेत मुलींना शिवणकाम, हस्तकला, विणकाम, हातमाग, तसेच मसाज व बेसिक संगणकाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे या मुली स्वावलंबी बनत आहेत.’’ 

अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचे ध्येय या विद्यार्थिनींनी समोर ठेवले आहे. यंदाच्या प्रदर्शनात माजी विद्यार्थिनींनी बनविलेल्या वस्तूही मांडण्यात येणार आहेत. या वस्तू अधिकाधिक ग्राहकांनी विकत घेतल्यास या मुलींसाठी तो फार मोठा पाठिंबा ठरणार आहे, असे प्रशासकीय अधिकारी प्रीती पेठकर यांनी सांगितले. 

मागील वर्षी मी बनविलेल्या वस्तू प्रदर्शनात मांडल्या होत्या. त्यामुळे माझ्या कुटुंबाला मोठी मदत झाली. मला प्रकाश पाहता येणार नाही. मात्र, दिवे तयार करून दुसऱ्यांचे घर प्रकाशमान करण्याचे काम करत असल्याचे समाधान वाटते. 
- कल्पना खरात, दिव्यांग विद्यार्थिनी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT