पुणे

#GarbageIssue सोसायट्यांना कचराप्रश्‍नी केवळ नोटीसच

सकाळवृत्तसेवा

पुणे - जैविक कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या गृहप्रकल्पांना नोटीसच बजाविण्याचे काम महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत केले जात आहे. अद्याप कोणत्याही गृहप्रकल्पावर कारवाई झाली नाही. दिवाळीनंतर या गृहप्रकल्पांतील कचरा उचलला जाणार नाही आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा उभी न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा दावा विभागाने केला आहे.

नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमावलीनुसार गृहप्रकल्प, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, मंगल कार्यालये आदी ठिकाणी प्रतिदिन शंभर किलोहून अधिक कचरा निर्माण होत असेल, तर संबंधित संस्थेतच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंपोस्टिंग, बायोमिथेनायझेशन किंवा इतर तंत्रज्ञानाचा उपयोग करणे बंधनकारक आहे. याची अंमलबजावणीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. महापालिकेने या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्यावर्षीपासून संबंधितांना नोटीस देण्यास सुरवात केली आहे. या वर्षी ही नोटीस पाठविण्यात आली आहे. हा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटिशीमध्ये नमूद केले आहे. गेल्यावर्षी नोटीस दिल्यानंतर कोणत्याही संस्थेने कचरा प्रक्रिया करण्यासाठी व्यवस्था केली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अद्याप महापालिकेने कचरा उचलणे थांबविले नाही.

आम्ही ३२७ संस्थांना नोटिसा बजावल्या आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था न करणाऱ्या संस्थांचा कचरा उचलणे बंद करण्याची कार्यवाही दिवाळीनंतर करणार आहोत.
- ज्ञानेश्‍वर मोळक, प्रमुख, महापालिका घनकचरा विभाग
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

COVID-19 Vaccine Side Effects : कोविड-१९ लसीचे दुष्परिणाम आणि नुकसानभरपाईबाबत ठोस धोरण तयार करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा! सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाला...

Aadhaar Card Correction : सावधान! आधार कार्डच्या 3 किरकोळ चुकांमुळे बंद होऊ शकते तुमचे बँक खाते; लगेच करून घ्या 'हा' बदल

Ichalkaranji Latest Crime : इचलकरंजीच्या तारदाळमधील दर्गा चौकात राजकीय वाद उफाळला, थेट चाकूने छाती, पोटावर वार केले अन्

Chef Kunal Kapoor: डाएट करताय पण तेच ते बेचव खाऊन कंटाळा आलाय? मग शेफ कुणाल कपूरची फायबर रिच मिलेट खिचडी आजच ट्राय करा

SCROLL FOR NEXT