sewage enter in ram river sakal
पुणे

Pune News : सोसायटीचे मैलापाणी टाकले जाते रामनदीत; ‘आप’चा आरोप

राम नदीच्या संवर्धनासाठी अनेक संस्था, संघटना प्रयत्न करत असताना बावधन मधील एका सोसायटीमध्ये तयार होणारे मैलापाणी रोज टँकरमधून आणून राम नदीमध्ये टाकले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राम नदीच्या संवर्धनासाठी अनेक संस्था, संघटना प्रयत्न करत असताना बावधन मधील एका सोसायटीमध्ये तयार होणारे मैलापाणी रोज टँकरमधून आणून राम नदीमध्ये टाकले जात आहे. सोसायटीमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बांधकाम व्यावसायिकाने बंद पडला आहे, तरीही महापालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, उपाध्यक्ष अॅड. कृणाल घारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रवक्ते किरण कद्रे, अनिल कोंढाळकर, अक्षय शिंदे, सतीश यादव, निरंजन अडागळे यावेळी उपस्थित होते.

कृणाल घारे म्हणाले, ‘बावधन येथील या सोसायटीमध्ये ३३० सदनिकांमध्ये आहेत. बांधकाम नियमावलीनुसार सोसायटीमध्ये एसटीपी प्रकल्प बांधला आहे.

बांधकाम व्यावसायिकाकडूनच हा प्रकल्प चालविला जात असला तरी कित्तेक महिन्यापासून तो बंद आहे. येथील प्रक्रिया केलेले सांडपाणी टँकरमध्ये भरून ते थेट राम नदीत सोडले जात आहे. रोज टँकरच्या १० ते १२ फेऱ्या होत आहेत. याविरोधात महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली आहे.

जगदाळे म्हणाले, सोसायटीतील एसटीपी सुरु करून प्रक्रिया केलेले पाणी बाहेर आले पाहिजे. महापालिकेने संबंधितांवर कारवाई न केल्यास पुढील दोन दिवसात आम्ही सोसायटीतून एकही टँकर बाहेर पडू देणार नाही. शहरातील मुळा मुठा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा गंभीर झाला आहे, महापालिकेचे एसटीपी व्यवस्थित चालविले जात नाहीत. जायका प्रकल्पाचे कामही संथ गतीने सुरु आहे. यावर प्रशासनाने श्वेतपत्रिका काढावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT