पुणे

‘सोलहकारण भावना अनुशीलन’मधून जैन तत्त्वज्ञानाचा परिचय

CD

PNE26W59782 -
सोलापूर : ‘सोलहकारण भावना अनुशीलन’ ग्रंथाचे विमोचन करताना मुनिश्री सुप्रभसागर महाराज.

‘सोलहकारण भावना अनुशीलन’मधून जैन तत्त्वज्ञानाचा परिचय
आचार्यश्री विशुद्धसागरजी मुनिराज लिखित ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रकाशित

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ : जैन तत्त्वज्ञानातील सोलहकारण भावनांचे महत्त्व उलगडणारा ‘सोलहकारण भावना अनुशीलन’ हा ग्रंथ मराठी वाचकांच्या भेटीला आला आहे. आचार्यश्री विशुद्धसागर मुनिराज लिखित या ग्रंथाचे विमोचन मुनिश्री सुप्रभसागर महाराज यांच्या हस्ते १४ ऑक्टोबर रोजी शिंगवी भवन येथे झाले. जैन संस्कृती संरक्षक संघाच्या (जीवराज ग्रंथमाला) वतीने हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. डॉ. संजीव शहा यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे.
आचार्यश्री विशुद्धसागर मुनिराज यांचे आध्यात्मिक विचार मराठी भाषेतून वाचकांपर्यंत पोचावेत, हा अनुवादामागील उद्देश आहे. जैन धर्मातील सोलहकारण भावनांचे महत्त्व, त्यांचे चिंतन आणि आत्मकल्याणासाठी आवश्यक असलेले अनुशीलन याविषयी ग्रंथात मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे वाचकांना या भावनांचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.
या विमोचन सोहळ्यास अरविंद दोशी आणि डी. आर. शहा-इंडी उपस्थित होते. या ग्रंथामुळे जैन धर्मातील आध्यात्मिक विचारांचे चिंतन करण्याची प्रेरणा मिळेल, तसेच धार्मिक साहित्याच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: शफाली वर्माचे २४ चेंडूत अर्धशतक अन् दोन वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृती मानधनालाही तिच्याच समोर टाकलं मागे

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

Baramati Crime: बारामतीत राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; गोळीबाराचा प्रयत्न, हाताला जखम

SCROLL FOR NEXT