पुणे

वृत्तपत्र लेखक मंचाचे पुरस्कार जाहीर

CD

PNE26W62382
डॉ. विजय कानेटकर
प्रा. प्रेमचंद माने

वृत्तपत्र लेखक मंचाचे वार्षिक पुरस्कार जाहीर
डॉ. विजय कानेटकर, प्रा. प्रेमचंद मेने यांचा आज गौरव
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३० ः सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाच्या वतीने दिले जाणारे यंदाचे वार्षिक पुरस्कार जाहीर झाले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. विजय कानेटकर यांना ‘कै. सौ. दानम्मा मल्लिकार्जुन किणगी स्मृती वैद्यकीय सेवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ज्येष्ठ पत्रलेखक आणि निवृत्त प्राचार्य प्रेमचंद मेने यांना ‘कै. तात्यासाहेब तेंडुलकर पत्रलेखक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (ता. ३१) सायंकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयातील लोकमान्य टिळक सभागृहात होणार आहे. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर अध्यक्षस्थानी राहतील. कर्करोग शल्यचिकित्सातज्ज्ञ डॉ. शिरीष कुमठेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
यावेळी वार्षिक पत्रलेखन स्पर्धेतील विजेत्यांनाही पुरस्कार देण्यात येणार आहेत. स्पर्धेत धोंडप्पा नंदे यांनी प्रथम, अभिजित भानप यांनी द्वितीय, तर श्रीनाथ कबाडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. श्याम तळोकर आणि धनंजय नाईकनवरे यांना उत्तेजनार्थ क्रमांक जाहीर झाला आहे. सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन मंचाचे अध्यक्ष फैय्याज शेख आणि कार्यवाह अरुण धुमाळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ausa Crime : शेतातील शेडमध्ये सुरू होता बनावट दारूचा कारखाना! येल्लोरीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; ५.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं मोठं पाऊल! मुदत संपलेल्या अन्नपदार्थांच्या पुनर्विक्रीबाबत नवे नियम लागू

Marathi News Live Updates : नवी मुंबई महापालिकेच्या दुर्लक्षाविरोधात ठाकरे सेना आक्रमक; तुर्भे उड्डाणपुलासाठी ठाणे-बेलापूर महामार्ग रोखला

Eye Infection Alert in Pune: डोळे येण्यापासून बचावासाठी फक्त औषधं पुरेशी नाहीत! वैयक्तिक स्वच्छतेबाबत डॉक्टरांनी दिला कानमंत्र

गुरुच्या राशीबदलाने ५ राशींना अच्छे दिन! करिअरमध्ये प्रगती, रखडलेली कामंही पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT