पुणे

शहर गुन्हेगारी

CD

घराचे कुलूप तोडून
दागिने लंपास
सोलापूर : बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील रोकड व दागिने, असा एकूण ९६ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. या प्रकरणी गोरख दत्तात्रय बरडे (रा. सकीना नगर तांडा, बेलाटी, ता. उत्तर सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलिसांत फिर्याद दिली. ११ मेच्या मध्यरात्री ही चोरी झाली, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस हवालदार उपासे तपास करीत आहेत.
-----------
घरात प्रवेश करून
पळविला लॅपटॉप
सोलापूर : घराचा मुख्य दरवाजा पुढे ढकलून चोरट्याने घरातील २० हजार रुपयांचा लॅपटॉप चोरुन नेला आहे. १९ मे रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही चोरी झाल्याची फिर्याद सईद अहमद म.उस्मान मुंडेवाडी (रा. बुधवार बझार, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिसांत दिली. सहायक पोलिस उपनिरीक्षक नदाफ तपास करीत आहेत.
-----------------
दहा जणांनी संगनमताने
जमीन विकल्याने गुन्हा
सोलापूर : कुंभारी येथील गट क्र. ६४७/१/ब मधील ४१ गुंठ्यातील चार हजार ८४७ चौरस फूट जागा नजरुद्दीन मौला शेख यांच्या वाटणीस आली होती. ती जागा नोटरीद्वारे विक्री केली. पुन्हा त्याच जागेचा जरुद्दीन शेख, मासुमबी मजरुद्दीन शेख, तुराब शेख, नामजीन शेख, खाजाबाई शेख, शबाना शेख, सलीमा शेख व दौलतगी पठाण यांनी अब्दुल सतार शेख व किशोर सरवदे यांच्यासोबत इसारा पावती केली. नोटरी दस्ताद्वारे साठेखत करारपत्र व रजिस्टर कुलमुखत्यारपत्राद्वारे जागेचा व्यवहार करुन फसवणूक केल्याची फिर्याद युवराज अशोक जानकर (रा. वज्रेश्वरी नगर, अक्कलकोट रोड) यांनी जेलरोड पोलिसांत दिली. त्यावरुन दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलिस निरीक्षक चानकोटे तपास करीत आहेत.
---
घराचा कोयंडा तोडून
लाखाचा ऐवज लंपास
सोलापूर : येथील अभिमानश्री नगरातील पंधे अपार्टमेंटमध्ये चोरट्याने ११ ते १३ मे दरम्यान बंद घराचे सेफ्टी डोअर व लाकडी दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरात शिरलेल्या चोरट्याने बेडरुममधील लाकडी व लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड, असा एकूण एक लाख सातशे रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. या प्रकरणी संजय मधुकर येऊलकर यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. चोरीला गेलेल्या ऐवजात १२ ग्रॅमची सोन्याची चेन, १० ग्रॅमची चांदीची चेन व साडेपंधरा हजार रुपयांची रोकड होती, असेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी सुरू केली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार परीट करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT