पुणे

विकास मंचचे पुनमगेटवर आंदोलन

CD

PNE26W43145
सोलापूर : पूनम गेटजवळ धरणे आंदोलन करताना सोलापूर विकास मंचचे पदाधिकारी.

‘विकास मंच’चे पूनम गेटवर धरणे आंदोलन
विमानसेवा, नियमित पाणीपुरवठा, आयटी पार्क अन् पुलांच्या कामांसाठी निवेदनाद्वारे मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ : सोलापूर शहर व जिल्ह्यातील विमानसेवा, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आणि रखडलेल्या पायाभूत सुविधा यांसारख्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘सोलापूर विकास मंच’च्या वतीने आज जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (पूनम गेट) अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी डोक्यावर काळ्या टोप्या परिधान करून निदर्शने केली आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले. या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. सोलापूर विमानतळावरून नाईट लँडिंगसह अशास्त्रीय स्पीड ब्रेकर हटवून खड्डे बुजवावेत आणि ‘रॅपिडो’सारख्या नागरी सेवांबाबत संतुलित व न्याय्य धोरण आखावे. पूनम गेट येथील या आंदोलनात सोलापूर विकास मंचचे आनंद पाटील, केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने या मागण्यांवर कालबद्ध व ठोस कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

चौकट...
सोलापूर विकास मंचच्या प्रमुख मागण्या
१. विमानसेवा व नाईट लँडिंग : होटगी रोड विमानतळावरील विमानसेवा नियमित सुरू राहण्यासाठी तातडीने ‘नाईट लँडिंग’ची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
२. पाणीपुरवठा व परिवहन : शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करून निश्चित वेळापत्रकानुसार दररोज पाणी द्यावे. तसेच शहर बससेवा तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करून बसची देखभाल सुनिश्चित करावी.
३. रस्ते व पुलांचे रुंदीकरण : कंबर तलाव-पत्रकार भवन पूल, रामलाल चौक पूल, आसरा पूल आणि होटगी रोडवरील रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावीत. छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोरेगाव ४५ मीटर रस्त्याचे रखडलेले काम सुरू करावे.
४. हद्दवाढ भागातील समस्या : हद्दवाढ भागातील २०२० पूर्वीच्या सोसायट्यांचे हस्तांतरण करून तेथे मूलभूत सुविधा पुरवाव्यात. तसेच क्रीडांगणे, उद्याने, नाट्यगृह, स्विमिंग टँक व नवीन बसस्थानकाचे ठोस नियोजन करावे.
५. उद्योग व आयटी पार्क : सोलापुरात ‘आयटी पार्क’साठी जागा आरक्षित करून नवीन उद्योगांना प्रोत्साहन द्यावे. शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज, महिला आयटीआय आणि सिमेट सेंटर तातडीने सुरू करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT