पुणे

आजपासून शहरात जंतनाशक गोळी वाटपमोहिम

CD

शहरात आजपासून १ लाख ५३ हजार बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

सोलापूर, ता. २६ : सोलापूर शहरात मंगळवारी (ता. २७) राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेद्वारे १ ते १९ वर्षे वयोगटातील १ लाख ५३ हजार बालकांना अल्बेंडाझोल या जंतनाशक गोळीचे वितरण केले जाणार आहे. शासकीय, अनुदानित व खासगी शाळा, आश्रमशाळा, अंगणवाड्या आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात येईल. शाळाबाह्य बालकांसाठी आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. मोहिमेत गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी ३ नोव्हेंबरला विशेष फेरी (मॉप-अप राऊंड) घेण्यात येणार आहे.
मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमींच्या संसर्गामुळे शरीरातील पोषकद्रव्यांच्या शोषणावर परिणाम होऊन रक्तक्षय व कुपोषण होऊ शकते. त्याचा बालकांच्या शारीरिक व बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित जंतनाशक औषधोपचारासोबतच हातांची स्वच्छता राखणे, अनवाणी न फिरणे, स्वच्छ पाण्याचा वापर करणे, शौचालयाचा वापर आणि परिसर स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे.
बालकांचे आरोग्य आणि पोषणस्थिती सुधारणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मोहिमेत वापरण्यात येणारे अल्बेंडाझोल हे औषध सुरक्षित असून, गोळ्यांच्या आवश्यक गुणवत्ता चाचण्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्ण करण्यात आल्या आहेत. या मोहिमेमुळे बालकांमधील कुपोषण व रक्तक्षय रोखण्यास मदत होईल, असे आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांनी सांगितले. मोहिमेची १०० टक्के अंमलबजावणी यशस्वी करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे शाळा व महाविद्यालयांना करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये दिवसा मालवाहतुकीस बंदी; मालाची चढ-उतार करण्यास रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच परवानगी

Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

Pune News : पक्षकाराची सही, प्रतिज्ञापत्र नसल्याने पोटगीचा दावा फेटाळला; उत्पन्नाचा तपशीलही दिला नाही

SCROLL FOR NEXT