पुणे

डीसीसी बँकेची वार्षिक सभा २१ सप्टेंबरला

CD

जिल्हा बँकेची वार्षिक सभा २१ सप्टेंबरला
वैयक्तिक सभासद मतदारसंघातून १३ प्रतिनिधींची निवड; १९ सप्टेंबरला दोन्ही गटांच्या सभा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २०२५-२६ या आर्थिक वर्षाची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी २१ सप्टेंबरला दुपारी एक वाजता बँकेच्या प्रधान कार्यालयातील लोकनेते बाबूराव (आण्णा) पाटील सभागृहात होणार आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी प्रशासक कुंदन भोळे यांच्या आदेशानुसार याबाबतची नोटीस प्रसिद्ध केली आहे.
सभेत मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करणे, २०२५-२६ चा अहवाल, ताळेबंद, सांपत्तिक पत्रके व नफा वाटणी पत्रकास मान्यता देणे, अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे, २०२६-२७ च्या अंदाजपत्रकास मान्यता देणे आणि बँकेच्या बाहेरील कर्ज उभारणीची मर्यादा ठरविणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच, वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे, आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी वैधानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती आणि बँकेच्या पोटनियम क्रमांक तीनमधील अधिकृत भागभांडवलात बदल करण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, बँकेच्या वैयक्तिक सभासद मतदारसंघातून एकूण १३ प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. गट क्रमांक एकमधून चार, तर गट क्रमांक दोनमधून नऊ प्रतिनिधी निवडले जातील. गट क्रमांक एकमध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी व अक्कलकोट तालुक्यांचा समावेश आहे. या गटातील वैयक्तिक सभासदांची प्रतिनिधी निवडीसाठी सभा शनिवारी १९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता बँकेच्या मुख्य कार्यालयातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सभागृहात होणार आहे.
गट क्रमांक दोनमध्ये मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस व मंगळवेढा तालुक्यांचा समावेश आहे. या गटातील सभासदांची सभा त्याच दिवशी दुपारी एक वाजता होणार आहे. दोन्ही गटांतील प्रतिनिधीपदासाठी इच्छुक सभासदांनी १७ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नामनिर्देशनपत्र दाखल करावे लागणार आहे. नामनिर्देशनपत्रासाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच, सोसायटी सभासदांनी प्रतिनिधी पाठविताना संबंधित सोसायटीचा ठरावही सादर करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT