पुणे

सोलापूर- जिल्हा बँक निवडणुकीसाठी ११ मतदान केंद्रे निश्चित

CD

सोलापूर जिल्हा बँक
निवडणुकीसाठी ११ मतदान केंद्रे

२६ नोव्हेंबरला मतदान, २७ ला शिवदारे सभागृहात मतमोजणी

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे एकूण ११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. येत्या २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत जिल्ह्यातील २,५९६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली. जिल्हा बँकेच्या एकूण १९ जागांपैकी १० जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ९ जागांसाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीची मतमोजणी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून हैदराबाद रोडवरील सहकार महर्षी वि. गु. शिवदारे अण्णा सभागृहात पार पडणार आहे.


तालुकानिहाय मतदान केंद्रे खालीलप्रमाणे :
अक्कलकोट : स्वामी समर्थ सहकारी बँकेची शाखा (ए-वन चौक)
बार्शी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची शाखा (ढगे मळा)
करमाळा : पंचायत समिती सभागृह
माळशिरस : जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श कन्या शाळा
माढा : सहाय्यक निबंधक कार्यालय
मंगळवेढा : जिजामाता प्रशालेतील शिशुविहार (दुर्गामाता नगर, कारखाना रोड)
मोहोळ : गटसचिव मिटिंग हॉल (बाजार समिती आवार)
पंढरपूर : शेतकरी निवास (बाजार समिती)
सांगोला : पंचायत समितीचे बचत भवन
उत्तर सोलापूर : डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर
दक्षिण सोलापूर : समाजकल्याण केंद्र, रंगभवन चौक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रॅलीत फुलांच्या उधळणीसाठी आलेल्या JCBने चिरडले, भाजप नेत्याच्या मुलाचा मृत्यू; आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने शिवसैनिक आक्रमक, शिवसेना भवनासमोर ठाकरेसेनेचं आंदोलन; शायना एनसींची पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी

Mumbai Ahmedabad Highway: एकापाठोपाठ चार अवजड वाहने भिडली; आंबोलीत अपघातामुळे वाहनांच्या रांगा

Vantara Elephant Treatment : कोल्हापुरातील शिरोळमधील आणखी एका हत्तीणीवर वनताराकडून होणार उपचार; सहा डॉक्टरांचे पथक दाखल

Tarali Pumped Storage Project : तारळी प्रकल्पाचे काम कधी आणि कसे सुरू झाले? पर्यावरण व वन्यजीव मंजुरीबाबत अदानी ग्रीन एनर्जीने दिली 'ही' महत्त्वाची अपडेट, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT