पुणे

शहर गुन्हेगारी

CD

पत्नी, मेव्हणींकडून पतीस मारहाण

सोलापूर : घरी बसून काहीजण दारू पित बसले होते. त्यावेळी यल्लप्पा लालू गायकवाड (रा. लिमयेवाडी, १६ संडासजवळ, सोलापूर) यांनी त्यांच्या पत्नीला जाब विचारला. त्यावेळी पत्नी अश्विनी गायकवाड हिने ‘माझी मर्जी मी कोणालाही घेऊन दारू पिणार, मी अजून चार पोरं घेऊन दारू पित बसणार, तू मला विचारणार कोण’ असे म्हणून तिने वाद घातला. त्यावेळी मेव्हणी गुरुदेवी जाधव हिने जोरात ढकलून दिले. त्यावेळी कानाला, डोक्याला जखम झाली. रोहित जाधव याने शिवीगाळ करून ‘तुला बघून घेतो, तु येथे थांबू नको, निघून जा’ अशी दमदाटी केली. दुसरी मेव्हणी पूजा दळवी हिने माझ्या बहिणीचे घर आहे असे म्हणून घरातील चाकू आणून हातावर वार केला, अशी फिर्याद यल्लप्पा गायकवाड यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली. २६ एप्रिलला रात्री साडेअकराच्या सुमारास हा वाद झाला. सहायक पोलिस उपनिरीक्षक नीळ तपास करीत आहेत.
---------------
पत्ते खेळू देत नाही
म्हणून दोघांची मारहाण
सोलापूर : ‘तू आम्हाला पत्ते खेळू देत नाही, तुला मस्ती आली आहे’ असे म्हणून सोन्या व नट्या या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली, अशी फिर्याद विश्वनाथ नागनाथ जाधव (रा. तुळजापूर नाका, मड्डी वस्ती, सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. २६ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास मड्डी वस्तीतील पिठाच्या गिरणीजवळ ही मारहाण झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यांना तेथून जायला सांगितल्यावर सोन्याने दगड उचलून मारहाण केली. नाट्याने हातातील काठी घेऊन मारहाण केली, असेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. पोलिस हवालदार वाडीकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटात जाणार; मातोश्रीवर तातडीची बैठक

Maratha Reservation: मनोज जरांगेंचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरू; वैद्यकीय तपासणीस नकार, डॉक्टरांचे पथक परतले

Pune MIDC: पवन मावळात होणार नवीन एमआयडीसी! जमीन मोजणी पूर्ण; बऊर, करूंज, ब्राह्मणवाडी येथे ११०० एकरावर प्रस्तावित

Marathi News Live Updates : ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद, हाके मुंबईला जाण्यावर ठाम तर महासंघ वेट अँड वॉचच्या भूमिकेत

टॅक्सीचे अवाजवी भाडे, महाग खाद्यपदार्थ, बंद चार्जिंग पॉइंट; नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांचे गैरसोयींच्या 'उड्डाणां'नी हाल

SCROLL FOR NEXT