लोगो : राष्ट्रीय अवकाश दिन
---
PNE26W44180
सोलापूर : स्मृतिवनात सुरक्षित असलेली अवकाश दुर्बीण.
---
PNE26W44092
सोलापूर : अवकाश दुर्बिणीच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. ए.पी.जे. कलाम सोलापुरात आले होते, तेव्हाचे छायाचित्र.
---
सोलापूरकर डॉ. ए.पी.जे. कलामांची स्मृती जपतील का?
२०१२ मध्ये खरेदी झालेली तारे निर्मिती दाखवणारी अवकाश दुर्बीण १२ वर्षांपासून धूळखात
प्रकाश सनपूरकर : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ : सोलापूरकर आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे. कलाम यांचे नाते एका संशोधनात्मक कार्याने जोडले गेले आहे. स्मृतिवनात अवकाश संशोधनासाठी बसविण्यात आलेल्या दुर्बिणीच्या (टेलिस्कोप) उद्घाटनासाठी डॉ. कलाम सोलापुरात आले होते. या घटनेला एक तपाचा काळ लोटला, तरी अद्याप ही अवकाश दुर्बीण सुरू झालेली नाही. सोलापूरकर हा ठेवा जपून नव्या पिढीपर्यंत पोचवतील का, हा प्रश्न कायम आहे.
२०१२ मध्ये अवकाश दुर्बीण खरेदी करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर ही दुर्बीण स्मृतिवनात स्थापित करण्यात आली. मात्र, दुर्बीण हाताळण्यासाठी कोणतीही संस्था नसल्याने ती बंद अवस्थेत राहिली.
मध्यंतरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने ही दुर्बीण ताब्यात घेण्याचे ठरविले होते. मात्र, काही जणांनी विद्यापीठात कर्मचारी नसल्याचे कारण सांगून याला अडथळा आणला. त्यानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यापासून शास्त्रज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी यांच्यापर्यंत अनेकांनी ही दुर्बीण विद्यापीठाच्या शिक्षण व संशोधनात भर घालणारी ठरेल, असे मत मांडले. त्यामुळे विद्यापीठाचे नाव डॉ. ए.पी.जे. कलाम यांच्याशी कायमचे जोडले जाईल, असे मानले गेले. मात्र, अद्यापही या अवकाश दुर्बिणीचा उपयोग सुरू झालेला नाही.
---
काय केले जाऊ शकते?
- संवेदनशील समाजसेवी संस्था, उद्योग व विद्यापीठाने दुर्बिणीच्या उपयोगासाठी पुढाकार घेण्याची गरज.
- सचिन जोग यांच्यासारख्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे शक्य.
- सोलापूरला अवकाश संशोधनात खूप पुढे घेऊन जाण्याची या दुर्बिणीची क्षमता.
---
दुर्बिणीची वैशिष्ट्ये
- उत्कृष्ट प्रकाश संकलन क्षमता : १४ इंच व्यास असल्यामुळे ही दुर्बीण लहान दुर्बिणींपेक्षा हजारो पटीने जास्त प्रकाश गोळा करते. यामुळे अत्यंत अंधूक किंवा दूरवर असलेले खगोलीय घटक स्पष्ट दिसतात.
- अत्यंत सूक्ष्म तपशील : यामुळे ग्रहांचे पृष्ठभाग, चंद्रावरील अगदी लहान खड्डे, दुहेरी तारे अत्यंत स्पष्टपणे व वेगळे ओळखता येतात.
- डीप-स्काय ऑब्जेक्ट्स : निहारिका (नेब्यूला), आकाशगंगा, स्टार क्लस्टर्स आणि सुपरनोव्हाचे अवशेष अत्यंत स्पष्ट आणि सखोलपणे पाहणे शक्य.
- अॅस्ट्रोफोटोग्राफी : खगोलीय घटकांचे उच्च क्षमतेचे फोटो घेणे शक्य.
- ट्रॅकिंग आणि कॉम्प्युटराइज्ड सिस्टिम : आधीच नोंदवलेल्या हजारो खगोलीय वस्तू शोधणे आणि पृथ्वीच्या गतीनुसार त्यांचे ट्रॅकिंग करणे शक्य.
---
कोट
अवकाश क्षेत्रात १४ इंच दुर्बीण ही निरीक्षणासोबत संशोधनासाठी उपयुक्त आहे. डॉ. कलामांनी तिचे उद्घाटन केले होते. ही दुर्बीण संशोधनासाठी विद्यापीठासारख्या संस्थांना नव्या उंचीवर घेऊन जाणारी ठरेल. अन्य संस्थांनी पुढाकार घेतल्यास निश्चितच चांगले होऊ शकेल.
- डॉ. व्यंकटेश गंभीर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.