पुणे

यांच्याकडून दुष्काळ पाहणी

CD

SLC26B29985
देगाव (ता. उत्तर सोलापूर) : येथे पिकांची पाहणी करताना अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी व महसूलची प्रशासकीय यंत्रणा.
---
अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून
पिकांच्या नुकसानीची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ : एल-निनोच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी उत्तर सोलापूर व मंगळवेढा तालुक्यांतील दुष्काळी गावांना भेटी देऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या स्थितीची माहिती घेतली.
बाळे येथे सोयाबीन, उडीद व तूर पिकांची पाहणी केली. पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले. शेतकऱ्यांशी संवाद साधताना निऱ्हाळी म्हणाले, शासनाकडे प्रस्ताव पाठवून शक्य तितकी मदत करण्यात येईल.
भोगाव येथे सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी सोलापूर शहर उत्तरचे तहसीलदार नीलेश पाटील व तालुका कृषी अधिकारी माळी उपस्थित होते. देगाव येथे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली.
माचणूर येथे ई-पीक पाहणी तसेच कांदा पिकाची पाहणी करण्यात आली. मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे पावसाअभावी पीक न घेतलेल्या चालू पड जमिनीचीही पाहणी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT