पुणे

ड्राय पोर्ट रचना

CD

PNE26W40085
ड्राय पोर्टची कार्यपद्धती दाखवणारी आकृती.
..................
उभारणी ड्रायपोर्टची : भाग - १

ड्रायपोर्ट ठरणार सोलापूरच्या विकासाचा मैलाचा दगड!
३०० किमी परिसरातील उद्योगांना फायदा; निर्यात खर्च, वेळेत बचत

प्रकाश सनपूरकर : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ८ : सोलापूरच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्याची क्षमता असलेल्या बहुप्रतीक्षित ड्रायपोर्टच्या उभारणीला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मागील महिन्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) सोलापूर येथे ड्रायपोर्टसाठी जागा शोधण्याचे निर्देश दिले. योग्य जागा आणि सक्षम रेल्वे-रस्ते जोडणी मिळाल्यास हा प्रकल्प सोलापूरसह सुमारे ३०० किलोमीटर परिसरातील उद्योग, निर्यातदार आणि कृषी क्षेत्रासाठी विकासाचा मैलाचा दगड ठरू शकतो.
सोलापूर हे वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्र असून केळी, डाळिंब, द्राक्षे, साखर, ज्वारी तसेच अन्नप्रक्रिया उद्योगाचेही मोठे क्षेत्र आहे. मात्र निर्यातक्षम माल बंदरापर्यंत पोचविताना वाहतूक, कंटेनर हाताळणी आणि बंदराशी संबंधित प्रक्रियांमुळे वेळ व खर्च वाढतो. ड्रायपोर्टमुळे निर्यातीसाठी आवश्यक अनेक प्रक्रिया सोलापुरातच पूर्ण करता येणार असल्याने उद्योगांची स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होऊ शकते. सध्या राज्यात जालना येथे अशा प्रकारचे ड्राय पोर्ट कार्यरत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी २०१८ मध्ये सोलापूरसाठी ड्रायपोर्टची घोषणा केली होती. त्यानंतर उद्योजक, व्यापारी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला. आमदार सुभाष देशमुख यांनीही हा विषय विविध स्तरांवर लावून धरला. आता एमआयडीसीकडून जागाशोध सुरू झाल्याने प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
-----------------------
निर्यात साखळी होईल सक्षम...
सोलापूरची भौगोलिक स्थिती आणि राष्ट्रीय महामार्गांची जोडणी लक्षात घेता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमावर्ती कर्नाटक व तेलंगणातील उद्योगांनाही या सुविधेचा लाभ होऊ शकतो. सोलापूरच्या ड्रायपोर्टला जवाहरलाल नेहरू पोर्टसह प्रमुख बंदरांशी रेल्वे व महामार्गाद्वारे जोडणी मिळाल्यास निर्यात साखळी अधिक सक्षम होईल.
..........................................
ड्रायपोर्ट म्हणजे काय?
ड्रायपोर्ट म्हणजे अंतर्देशीय कंटेनर डेपो (आयसीडी). येथे सीमाशुल्क तपासणी, कंटेनर हाताळणी, साठवणूक आणि निर्यातीशी संबंधित आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. त्यानंतर कंटेनर रेल्वे किंवा महामार्गाने थेट बंदराकडे पाठविले जातात. त्यामुळे बंदरापर्यंतचा वाहतूक खर्च व वेळ कमी करण्यास मदत होते. सोलापुरातील ड्राय पोर्टची जोडणी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टशी रेल्वे व महामार्गाद्वारे होण्याची अपेक्षा आहे.
..........................................
ड्राय पोर्टमधील प्रमुख विभाग अन् कार्ये
- कंटेनर यार्ड व स्टॅकिंग एरिया : आयात-निर्यातीचे कंटेनर्स साठवणूक.
- रीफर पॉईंट्स : नाशवंत मालासाठी वापरल्या जाणाऱ्या रेफ्रिजरेटेड कंटेनर्ससाठी पॉवर सॉकेट्स.
- हँडलिंग इक्विपमेंट्स : कंटेनर्सची चढ-उतार करण्याची यंत्रसामुग्री.
- कस्टम्स व क्लिअरन्स झोन : सीमाशुल्क विभागाचा तपासणी प्रक्रिया केंद्र.
- स्कॅनिंग स्टेशन : कंटेनर न उघडता आतील मालाची अचूक तपासणी.
- लॅब विभाग : कृषी माल, अन्नपदार्थांसाठी फायटोसॅनिटरी व क्वारंटाईन प्रयोगशाळा.
- शीतगृहे : शेतमाल आणि अन्नप्रक्रिया मालासाठी आधुनिक कोल्ड स्टोअरेज.
..........................................
कोट PNE26W39916
- सोलापूर हे देशातील प्रमुख वस्त्रोद्योग केंद्रांपैकी एक आहे. ड्राय पोर्टमुळे राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला बळकटी मिळेल. याशिवाय केळी, डाळिंब, द्राक्षे, साखर, आणि ज्वारी यांसारख्या कृषी उत्पादकांना याचा प्रचंड फायदा होईल.
- अशोक स्वामी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ
..........................................
कोट
PNE26W40102
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१८ मध्ये ड्राय पोर्टची घोषणा केली होती. तेव्हापासून सर्व लोकप्रतिनिधी व व्यापारी संघटना याच्या उभारणीसाठी आग्रही आहेत. राष्ट्रीय महामार्गांच्या कनेक्टिव्हिटीमुळे ड्राय पोर्टच्या माध्यमातून परिसरातील ३०० किलोमीटरच्या त्रिज्येतील उद्योग व निर्यातदारांना खूप मोठा दिलासा मिळेल.
- राजू राठी, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil and Devendra Fadnavis : शरद पवारांचे खासदार दिल्लीत नरेंद्र मोदींच्या भेटीला जाण्यापूर्वी जयंत पाटील-फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास; राजकीय चर्चांना उधाण

मला मराठ्यांपासून लांब ठेवण्याचा पूर्वनियोजित कट; मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर सडकून टीका

‘पँट वर करता येत नाही का?’ अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Viral Video

Marathi News Live Updates : कॉकरोच म्हणणाऱ्यांकडून डिग्री घेणं...; दीक्षांत सोहळ्याला सरन्यायाधीशांना बोलावल्याने विद्यार्थी संतापले

Kishori Pednekar: ... तर अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा फेकू, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा इशारा

SCROLL FOR NEXT