पुणे

राज्यस्तरीय '' उल्लास '' मेळाव्यात सोलापूर जिल्हयाचे उत्कृष्ट सादरीकरण

CD

ASI26B01192
नाशिक : येथे राज्यस्तरीय उल्लास मेळाव्यात उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल सोलापूरच्या प्रतिनिधींचा सत्कार करताना मंत्री दादा भुसे.
---
राज्यस्तरीय ‘उल्लास’ मेळाव्यात
जिल्ह्याचे उत्कृष्ट सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
आष्टी, ता. २१ : शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्य साक्षरता केंद्र व महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारचा महत्त्वाचा उपक्रम असलेल्या उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा राज्य मेळावा सी.एम.सी.एस. कॉलेज, गंगापूर रोड, नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या राज्यस्तरीय उल्लास मेळाव्यात सोलापूर जिल्ह्याने उत्कृष्ट सादरीकरण केले.
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, महाराष्ट्र राज्याचे संचालक नंदकुमार बेडसे, उपसंचालक कमलादेवी आवटे, नाशिक विभागाचे उपसंचालक संजयकुमार राठोड, उपसंचालक अन्नपूर्णा ओक, नाशिकच्या शिक्षणाधिकारी सरोज जगताप, सर्व डायटचे प्राचार्य तसेच महाराष्ट्र राज्यातून सर्व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) उपस्थित होते. सोलापूरच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंत्री दादा भुसे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध विषयांवरील सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्याला शासनाच्या विविध योजना, सर्व प्रकारचे कायदे, आरटीई, आरटीआय, महिला सुरक्षा, मूलभूत हक्क व स्वातंत्र्य हा विषय देण्यात आला होता. या विषयाचे राज्यस्तरावर उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (योजना) सुलभा वठारे, उपशिक्षणाधिकारी अर्चना जनबंधू, वरिष्ठ लिपिक श्री. पिसे, मोहोळ पंचायत समितीचे लक्ष्मण भोसले, मंगळवेढा गट साधन केंद्राचे उमेश दसाडे आणि पंढरपूर गटातून उपरी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हनुमंत बनसोडे यांनी सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT